शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजप आणि शिवसेना युती शक्य : भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 15:34 IST

आमची शिवसेनेसोबतची युती ही नैसर्गिक आहे. पण मध्यंतरीच्या काळात ही युती काही लोकांमुळे तुटली.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाजाआड झालेली चर्चा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब यामुळे राज्याच्या राजकारणात नवे राजकीय वारे वाहू लागले आहे. राज्यात राजकीय भूकंप होऊन भाजप- शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येण्याच्या चर्चा देखील खुलेआम झडू लागल्या आहेत. याच दरम्यान दोन्हीही पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडूनही उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी देखील भाजप आणि शिवसेना युती शक्य असल्याचे मत व्यक्त करतानाच पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेला सोबत घेण्याला आम्ही प्राधान्य देऊ असेही स्पष्ट केले आहे.

पुण्यात गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप व शिवसेनेवर नाते संबंधांवर नेमकं भाष्य केले. बापट म्हणाले, आमची शिवसेनेसोबतची युती ही नैसर्गिक आहे. पण मध्यंतरीच्या काळात ही युती काही लोकांमुळे तुटली.पण भविष्यात अशी युती झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल.तसेच भाजप आणि शिवसेना युती ही हिंदुत्वावर आधारित आहे.ती आगामी काळात सुद्धा होऊ शकते.कारण दोन्ही पक्षांचा हिंदुत्व हा श्वास आहे.

पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार..आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता पुन्हा येणार आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला  मी एक प्रमुख पक्ष मानत नाही, तर ती एक पश्चिम महाराष्ट्रातील एक पार्टी आहे. महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे आव्हान देखील बापटांनी यावेळी दिले.

आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा... 

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या लेटर बॉम्ब बद्दल बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले, सरनाईक हे सगळ्यांच्या मनातील बोलले आहे.आता निर्णय काय हे शिवसेनेच्या हाती आहे.भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेत युती शक्य आहे.

अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाही हे माहिती होतं, पण.....राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला झालेली गर्दीवरून बापटांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, अजित पवार हे शरद पवारांचं ऐकत नाही हे माहिती होतं, पण दादांचे कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाही हे मी पहिल्यांदा पाहतोय.

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना