सरस्वती मंदिर विद्यालयात चोरी

By Admin | Updated: April 25, 2017 04:02 IST2017-04-25T04:02:57+5:302017-04-25T04:02:57+5:30

सरस्वती मंदिर संस्था व त्याच्या नाईट कॉलेज आॅफ कॉमर्स अँड आटर््स महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कम लंपास

Theft in the temple of Saraswati temple | सरस्वती मंदिर विद्यालयात चोरी

सरस्वती मंदिर विद्यालयात चोरी

पुणे : सरस्वती मंदिर संस्था व त्याच्या नाईट कॉलेज आॅफ कॉमर्स अँड आटर््स महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कम लंपास करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संस्थेच्या रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम देशमुख (वय ५३, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. संस्थेच्या आवारातील प्रवेश गेटचे कुलूप तोडून व कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटून त्याद्वारे अज्ञात चोरट्याने प्रवेश केला.
कार्यालयामधील लाकडी कपाटे उचकटून त्याचे नुकसान केले आणि कपाटातील ४ हजार ७६३ रुपये रोख रक्कम लंपास केली. पोलीस उपनिरीक्षक एस. एल. चौधरी पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Theft in the temple of Saraswati temple