साड्यांच्या दुकानात चोरी ; ३७ हजारांचा ऐवज चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:09 IST2020-12-29T04:09:30+5:302020-12-29T04:09:30+5:30

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील सावरिया या लेडीज कपड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ...

Theft in a sari shop; 37 thousand stolen | साड्यांच्या दुकानात चोरी ; ३७ हजारांचा ऐवज चोरीस

साड्यांच्या दुकानात चोरी ; ३७ हजारांचा ऐवज चोरीस

धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील सावरिया या लेडीज कपड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत शिरून ३७ हजार किंमतीचा माल चोरून नेला आहे. याबाबत विजय विठ्ठल वाडेकर (वय ४०, रा. सिल्व्हर नेस्ट सोसायटी, जे.एस. पी. एम कॉलेज रस्ता, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार विजय वाडेकर हे शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान ते दुकान उघड करता गेले असता त्यावेळी दुकानाचे कुलूप तोडलेले अवस्थेत दिसून आले. त्यांनी शटर उघडून पाहिले असता साड्या, ड्रेस मटेरियल अस्ताव्यस्त अवस्थेत विखुरलेले दिसून आले. त्यांनी संपूर्ण दुकान तपासले असता काही माल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामध्ये रोख रक्कम, नवीन साड्या, ड्रेस मटेरियल, लेडीज पर्स, असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे हे करीत आहेत.

Web Title: Theft in a sari shop; 37 thousand stolen