तळेगाव ढमढेरेतून चंदनाच्या झाडांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:08 IST2021-07-04T04:08:10+5:302021-07-04T04:08:10+5:30

तळेगाव ढमढेरे येथील मोहन मळा येथे रवींद्र जाधव यांची शेती आहे. जाधव यांच्या शेतात काही चंदनाची झाडे देखील आलेली ...

Theft of sandalwood trees from Talegaon Dhamdhere | तळेगाव ढमढेरेतून चंदनाच्या झाडांची चोरी

तळेगाव ढमढेरेतून चंदनाच्या झाडांची चोरी

तळेगाव ढमढेरे येथील मोहन मळा येथे रवींद्र जाधव यांची शेती आहे. जाधव यांच्या शेतात काही चंदनाची झाडे देखील आलेली आहेत. शनिवारी (दि.३) रवींद्र जाधव यांची आई शालन जाधव या शेतात उसाच्या पिकाला सुरू असलेले पाणी पाहण्यासाठी गेल्या असताना त्यांना शेतात बांधावर असलेले चंदनाचे झाड तोडल्याचे आढळले. याबाबत त्यांनी रवींद्र जाधव यांना माहिती दिली. जाधव यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता शेतातील चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून त्यातील चंदन चोरून नेले असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल चव्हाण हे करत आहे.

Web Title: Theft of sandalwood trees from Talegaon Dhamdhere