दरोड्याच्या तयारीतील चोरटे अडकले जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:52 IST2017-08-03T02:52:32+5:302017-08-03T02:52:32+5:30

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीतील चोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाकडून अटक करण्यात आली आहे.

Theft of the robbery is ready to be stolen | दरोड्याच्या तयारीतील चोरटे अडकले जाळ्यात

दरोड्याच्या तयारीतील चोरटे अडकले जाळ्यात

हडपसर : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीतील चोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
जयसिंग काळुसिंग जुनी ( वय २७, रा. सवर््हे नं 86 वैदुवाडी बिराजदारनगर हडपसर), सोमनाथ नामदेव घारोळे ( वय 21 ), उमेश हरिश्चंद्र गायकवाड ( वय 23) आणि जलसिंग रजपुतसिंग दुधाणी ( वय 23) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पाचजणांपैकी एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. अर्जुनसिंग दुधाणी ( रा. रामटेकडी) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्डपसर येथील शिकलकरी गुन्हेगार व त्यांचे साथीदार पुणे-सोलापूर रस्त्यावरील एआयपीटी समोर असलेल्या पेट्रोलपंपावर दरोडा टाकणार असून, ते पेट्रोलपंपावर दबा धरून बसलेले आहेत. त्यांच्याजवळ पांढ-या रंगाची कार आहे अशी माहिती मिळाली दोन पथके तयार करून छापा टाकून त्यांना जागीच पकडण्यात आले.
गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Theft of the robbery is ready to be stolen