केडगाव येथील दुय्यम सहायक निबंधक कार्यालयात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:18 IST2021-02-18T04:18:06+5:302021-02-18T04:18:06+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालय बंद असताना चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. महत्त्वाच्या कागदपत्रांची उचकापाचक ...

केडगाव येथील दुय्यम सहायक निबंधक कार्यालयात चोरी
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालय बंद असताना चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. महत्त्वाच्या कागदपत्रांची उचकापाचक केली. कार्यालयाचे रेकॉर्ड असणारा लॅपटॉप व काही दस्तावेज लंपास केला. ही घटना उघड झाल्यावर सहायक निबंधक गुजर यांनी पोलिसांना फिर्याद दिली. त्यानंतर यवत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास सदर घटनेचा पंचनामा केला.
सहायक निबंधक कार्यालयाच्या वतीने नवीन माहिती अपडेट करण्यात आली. त्यामुळे आजच्या दिवसभराचे कामकाज उशिरा सुरू झाले. यासंदर्भात अॅड. शरद गायकवाड म्हणाले की, आज अनेक पक्षकार पुणे बारामती शिरूर दौंड येथून आले होते. चोरीमुळे त्यांची गैरसोय झाली. उशिरामुळे आजचे कामकाज उद्या करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
--