शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : एक दोन नव्हे चक्क ४५ दुचाकींची चोरी! दुचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:30 IST

साखळी चोरीचेही गुन्हे...

आळेफाटा:पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा तसेच अहमदनगर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद, नवी मुंबई या जिल्ह्यांतूनही गेल्या तीन वर्षापासून दुचाकी वाहने चोरणा-या चार अट्टल चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४५ दुचाकी असा सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व पोलिस निरिक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.प्रमोद लक्ष्मण सुरकंडे (वय २६) ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे ( वय २२) गणेश फक्कड कारखिले (वय २३) व आदिल मुक्तार अहमद कुरेशी (वय २१, सर्व रा. निघोज, ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गर कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे 29 मे रोजी दुपारच्या सुमारास रस्तालगत उभ्या असलेल्या शांताबाई बबन पावडे यांचे गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरून नेले. बाबत आळेफाटा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा करण्यात आला होता. याअनुषंगाने पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपास सुरू केला. सिसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे यातील अनोळखी इसम निघोज येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस पथकाने संशयित प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे यास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने अटक केली.

अटक आरोपी प्रमोद सुरकंडे याचेवर 2021 मध्ये अहमदनगर तोफखाना पोलिस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा असल्याचे तपासात उघड झाले. ''पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडले. झटपट पैसा कमविण्याचे उद्देशाने दुचाकी चोरून त्यांची विक्री करत असत. आळेफाटा पोलिसांनी सर्व 45 दुचाकी वाहने सात दिवसांतच जप्त करून पोलिस ठाण्यात आणली असून त्यांचेकडून आणखी चो-या उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर, उपनिरीक्षक रागिनी कराळे, चंद्रशेखर डुंबरे, विनोद गायकवाड, भिमा लोंढे; प्रकाश जढर, लहानू बांगर, अमित माळुंजे, पंकज पारखे, संजय शिंगाडे; पोपट कोकाटे, हनुमंत ढोबळे; मोहन आनंदगावकर, अशोक फलके यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी