आंबेगावात पुन्हा मोटारपंपाच्या केबलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:14 IST2021-08-15T04:14:45+5:302021-08-15T04:14:45+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शेतकरी गुलाब विष्णू सैद यांनी फिर्याद दिली आहे. महाळुंगे पडवळ येथील गट नंबर ३१५७ मध्ये ...

Theft of motor pump cable again in Ambegaon | आंबेगावात पुन्हा मोटारपंपाच्या केबलची चोरी

आंबेगावात पुन्हा मोटारपंपाच्या केबलची चोरी

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: शेतकरी गुलाब विष्णू सैद यांनी फिर्याद दिली आहे. महाळुंगे पडवळ येथील गट नंबर ३१५७ मध्ये शेतकरी सैद यांची विहीर आहे. अज्ञात चोरट्याने विहिरीतील १८ हजार ५०० रुपये किमतीची ओपन वेल पंप, पाच एचपीची स्टील बॉडी असलेली पाण्यातील इलेक्ट्रिक मोटारीची इलेक्ट्रिक केबल काढून व पाईप खोलून चोरी केले आहे. आंबेगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून वीज पंपाचे साहित्य चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शेतकरी गुलाब सैद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक विलास साबळे करत आहे.

मागील काही दिवसांपासून तालुक्यात शेतकऱ्यांच्या पंपसेट व तांब्याच्या वायरी मोठ्या प्रमाणवर चोऱ्या होत असताना एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही.

Web Title: Theft of motor pump cable again in Ambegaon