शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Pune | लोणावळा अंबरवाडी परिसरातील बंगल्यात चोरी; पाच लाखांचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 10:41 IST

अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या हाॅलमधील तब्बल पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला...

लोणावळा : येथील अंबरवाडी गणपती मंदिर परिसरातील हनिकाॅम व्हिला बंगला नंबर दोनमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान चोरी झाली. यामध्ये अज्ञात चोरट्याने बंगल्याच्या हाॅलमधील तब्बल पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

डाॅ. किरण राघवेंद्र चुळकी (वय ४४, रा. विजयपूर, कर्नाटक) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डाॅ. किरण चुळकी व अन्य हे अंबरवाडी गणपती मंदिर परिसरातील हनिकाॅम व्हिला बंगला नंबर दोनमध्ये थांबले होते. शनिवारी मध्यरात्री अडीच ते रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान बंगल्याच्या पाठीमागील उघड्या स्लायडिंगच्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने बंगल्यात प्रवेश करत हाॅलमध्ये ठेवलेला ॲपल कंपनीचा लॅपटाॅप व पाच वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाइल, खासगी बँकेचे डेबिट व केडिट कार्ड, एक हजार रुपये रोख असा पाच लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत. दरम्यान, बंगल्यातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर शहर पोलिसांनी ताब्यात घेतला असून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस