शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

चोरट्यांनी लांबवले ५ तोळे सोने; पुणे जिल्ह्यातील कोरेगाव मूळमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 13:03 IST

घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. 

ठळक मुद्देयोगेश राजेंद्र क्षीरसागर (वय २५) यांनी दिली फिर्याद१ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास

लोणी काळभोर : घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी योगेश राजेंद्र क्षीरसागर (वय २५, रा. ड्रीम्स निवारा, पी २ बिल्डिंग, फ्लॅट क्रमांक १३६, कोरेगाव मूळ, ता. हवेली, मूळ रा. धानोरे, ता. म्हाडा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश क्षीरसागर हे शेवाळवाडी येथील हुंदका शोरूम मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करतात. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते कामासाठी निघाले. त्यांची पत्नी स्वाती यांचे पुणे येथे काम असल्याने त्याही त्यांच्यासमवेत निघाल्या. जाताना त्यांनी फ्लॅटच्या दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावले.पुणे येथील काम झाल्यानंतर स्वाती क्षीरसागर या दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरी पोहचल्या, त्यावेळी त्यांना फ्लॅटच्या सेफ्टी दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी हा प्रकार पतीला कळवला. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता त्यांना घरातील लोखंडी कपाटाचे कुलुप तुटलेले व कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६५ हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे वजनाचे गंठण, १५ हजार ६०० रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे एक जोड कानातील झुबे, ४ हजार ८०० रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे कानातील स्टोनर, १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे दोन जोड, कानातील टॉप्स, २७ हजार १०० रुपये किमतीचे एक तोळे वजनाच्या दोन पिळ्याच्या अंगठ्या,  ८ हजार ९०० रुपये किमतीचे तिन ग्रॅम वजनाचे कानातील वेल,  ९०० रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, ९०० रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाचे नथ असा एकूण १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. एल. ननावरे हे करत आहेत.

टॅग्स :Bandopant Kondubhairiबंडोपंत कोंडूभैरीLoni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणे