कंपनीतून जनरेटरच्या बॅटऱ्या व तांबे चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:15 IST2021-08-21T04:15:28+5:302021-08-21T04:15:28+5:30

कोरेगाव भीमा येथील एका कंपनीच्या मोकळ्या जागेमध्ये कंपनीचे मोठे जनरेटर आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्रीचे सुमारास सदर कंपनीतील ...

Theft of generator batteries and copper from the company | कंपनीतून जनरेटरच्या बॅटऱ्या व तांबे चोरी

कंपनीतून जनरेटरच्या बॅटऱ्या व तांबे चोरी

कोरेगाव भीमा येथील एका कंपनीच्या मोकळ्या जागेमध्ये कंपनीचे मोठे जनरेटर आहे. १८ ऑगस्ट रोजी रात्रीचे सुमारास सदर कंपनीतील जनरेटर चालू करण्यासाठी कंपनीतील काही कामगार गेले असता जनरेटर चालूच झाले नाही. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असताना सदर जनरेटरमधील तीन मोठ्या बॅटऱ्या व तांब्याच्या महागड्या केबल असा तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे निदर्शनास आले. याबाबत कंपनीचे मॅनेजर राजीव रविकुमार नायर (रा. तुकारामनगर, खराडी, चंदननगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

Web Title: Theft of generator batteries and copper from the company