चोरीची गाडी पकडली

By Admin | Updated: November 27, 2014 23:06 IST2014-11-27T23:06:17+5:302014-11-27T23:06:17+5:30

सासवड-कापूरहोळ रस्त्यावर चोरटय़ांनी पळवलेली 8 लाखांची मोटारसायकल सासवड पोलिसांनी रातोरात चोरटय़ांना पकडून ताब्यात घेतली. एकाला अटक केली आहे.

Theft car caught | चोरीची गाडी पकडली

चोरीची गाडी पकडली

सासवड : सासवड-कापूरहोळ रस्त्यावर चोरटय़ांनी पळवलेली 8 लाखांची मोटारसायकल सासवड पोलिसांनी रातोरात चोरटय़ांना पकडून ताब्यात घेतली. एकाला अटक केली आहे. 
याबाबत पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 26 रोजी रात्नी पुणो येथून अभिजित नामदेव पवार हे आपली हरले-डेव्हिडसन कंपनीची 8 लाख 4क् हजार रुपये किमतीची मोटारसायकल टेम्पोत घालून मिरज शहराकडे चालले होते. पुरंदरमधील चिव्हेवाडी घाटात रात्नी 9.क्क् वाजता तीन जणांनी मोटारसायकलवरून येऊन टेम्पो अडविला व पवार व त्यांचे साथीदार गौतम जगधनी यांना मारहाण करून मोटारसायकलसह टेम्पो पळविला. नोकिया कंपनीचा मोबाईलही काढून घेतला. पवार यांनी देवडी येथील ग्रामस्थांना ही घटना सांगितली. ग्रामस्थांनी सासवड पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक एस. आर.  गौड,  दोन अधिकारी व कर्मचारी घेऊन त्वरित घटनास्थळी गेले. याच वेळी त्यांनी गावोगावच्या ग्राम सुरक्षा दलांना सांगून नाकाबंदी केली. चोरून नेलेला टेम्पो देवडीपासून 2 किमी अंतरावर पकडला. या वेळी उत्तम महादेव ननावरे (वय 26 रा. हडपसर) याला अटक केली. इतर दोन जण पळून गेले.  ग्रामस्थांचे व ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने चोर पकडल्याचे गौड यांनी आवर्जून सांगितले.

 

Web Title: Theft car caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.