शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणाऱ्या सराईताला अटक : २० गुन्हे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:04 IST

निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़. त्याने मागील ३ वर्षात कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनी ११ लाखांचे सोने तसेच चांदीचे दागिने केले जप्त कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या असून त्यातील १८ गुन्हे भरदिवसा

पुणे :  कुलुपबंद सदनिका हेरून भरदिवसा घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईताला त्याच्या साथीदारासह खंडणी विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने जप्त केले असून त्याच्याकडून शहरात दाखल असलेले एकूण २० गुन्हे उघडकिस आणले आहेत.       निखिल उर्फ माँटी दत्तात्रय कंगणे (वय २४, रा. आनंदनगर, तळेगाव ढमढेरे,ता. शिरूर) त्याचे नाव आहे. तर अमोल रघुनाथ गोपकर (वय २८, रा. भिमशक्तीनगर, स्पाईन रोड,चिखली) असे त्याच्या अटक करण्यात आलेल्या साथीदाराचे नाव आहे.    याबाबत पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी माहिती दिली़. खंडणी विरोधी पथकातील कर्मचारी अमोल पिलाने यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार निखिल कंगणे हा साथीदारासह सोन्याचे दागिने विकण्यासाठी हडपसरगाव येथील गांधी चौकात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचला आणि निखिल व अमोल यांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी शहरात हडपसर, चंदननगर, येरवडा, विमानतळ, वानवडी, फरासखाना, सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे माळवाडी तसेच निगडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी ११ लाखांचे सोने तसेच चांदीचे दागिने जप्त केले आहेत. निखिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये यापूर्वी १६ गुन्हे दाखल होते़. त्याने मागील ३ वर्षात कुलुपबंद सदनिका हेरुन २० घरफोड्या केल्या असून त्यातील १८ गुन्हे भरदिवसा केले आहेत. पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली होती़. त्यानंतर तो तळेगाव ढमढेरे येथे रहायला गेला होता़. त्यामुळे तो पोलिसांच्या नेहमीच्या चेकिंगमध्ये मिळून येत नव्हता़. त्याने चोरलेले दागिने त्याने घरातील बेडच्या पाईपमध्ये लपवून ठेवले होते.ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी अविनाश मराठे, पांडुरंग वांजळे, रमेश गरूड, उदय काळभोर, एकनाथ खंदारे, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदिप शिंदे, संतोष मते, सचिन कोकरे, धिरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, शिवानंद बोले, हनुमंत गायकवाड, नारायण बनकर, प्रकाश मगर आदीच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसtheftचोरी