शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्राहक पंचायतीने पकडली भक्तीच्या दरवळातील चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 07:00 IST

उदबत्तीसारख्या भक्ती सधानांचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून देखील ग्राहकांची लुट सुरु असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

ठळक मुद्देकंपनीचा प्रताप : उदबत्तीच्या वजनातही केले जातेय पापकंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध १४ उत्पादनांमध्ये कंपन्यांकडून लूट कॉफी, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने आणि उदबत्ती अशा वस्तूंमध्ये ग्राहकांची लूट

विशाल शिर्के पुणे : उदबत्तीसारख्या भक्ती सधानांचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून देखील ग्राहकांची लुट सुरु असल्याचा प्रकार उघड झाला आहे. उदबत्ती कंपनी कडून वजनात होणारी चोरी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पडकली असून, त्याची तक्रार वैधमापन शास्त्र विभागाकडे केली आहे. प्रथितयश कंपनीची टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधनाची क्रिम, जंतूनाशक कंपन्यांचे साबण, दररोजच्या वापरातील साबण, थंडीपासून त्वचेचे संरक्षण करणारी पेट्रोलियम जेली, चहा, शॅम्पू, कपड्यावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध १४ उत्पादनांमध्ये कंपन्यांकडून कशी लूट केली जाते, हे नुकतेच लोकमतने उघड केले आहे. त्या पाठोपाठ उदबत्ती बनविणारी कंपनी देखील अशा वजन चोरीत मागे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने कॉर्पोरेट कंपन्यांची लबाडी पकडल्यानंतर भक्ती मार्गातील चोरी देखील धरली आहे. या बाबत माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विजय सागर म्हणाले, मिलिटरी कँटीनमधून एका ब्रँडचे उदबत्तीचे पाकिट खरेदी केले होते. त्यावर वजन ३० ग्रॅम वजनाची एमआरपी ४१ असल्याचे छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात उदबत्तीचे वजन केले असता ते केवळ १९ ग्रॅम भरले. तर, त्याच्या पाकिटाचे वजन ३५ ग्रॅम आहे. या बाबत वैधमापनशास्त्र विभाग आणि डीआरडीओच्या कार्यालयाकडे तक्रार केली आहे. -------------मिलिटरी कॅन्टीनमधून कंपनीच्या किती उदबत्ती पाकिटांची विक्री झाली याचा हिशेब करुन सबंधित कंपनीकडून दंडासह रक्कमेची वसुली केली पाहीजे. विजय सागर, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे --------------ग्राहकांची कोणीच घेईना दखल कॉफी, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने आणि उदबत्ती अशा विविध दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये ग्राहकांची लूट झाल्याचे ग्राहक पंचायतीने समोर आणले आहे. या प्रकरणी राज्याचा वैधमानशास्त्र विभाग, ग्राहक मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, कॉम्पिटीशन कमिशन अ‍ॅफ इंडिया आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कमिशन आॅफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यातील अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कमिशन आॅफ इंडियाने संबंधित प्रश्न आमच्या आखत्यारीत येत नसल्याचे कळविले आहे. इतर विभागांनी तक्रारीची दखल देखील घेतली नसल्याचे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विजय सागर म्हणाले.-------

 

टॅग्स :Puneपुणेfraudधोकेबाजी