टेम्पोचे झाकण उचकटून १७२ लिटर डिझेलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST2021-04-08T04:10:42+5:302021-04-08T04:10:42+5:30
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी भीमा भिल्लू राठोड (वय ३९, रा. कवडी माळवाडी, गुजरवस्ती, ...

टेम्पोचे झाकण उचकटून १७२ लिटर डिझेलची चोरी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी भीमा भिल्लू राठोड (वय ३९, रा. कवडी माळवाडी, गुजरवस्ती, ता. हवेली) हे श्रीदत्त ट्रेडर्स यांचे ट्रान्सपोर्टमध्ये टेम्पोचालक म्हणून कामास आहेत. सोमवार (५ एप्रिल) रोजी रात्री ८ च्या सुमारास त्यांनी त्यांचे मालकाने टेम्पो पार्क करण्यासाठी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती, कवडीमाळवाडी, कवडीपाट टोल नाका येथे भाडेतत्वावर घेतलेले जागेत टेम्पो नंबर (एमएच.१२ एसएफ ४५४८) पार्क केला होता. त्याच्या सोबत असणारे इतर ३ टेम्पोचालक यांनी त्यांचे ताब्यातील टेम्पो हे तेथे नेहमीप्रमाणे पार्किंग केले होते. त्यानंतर सर्वजण जवळ राहवयास असल्याने मुक्कामी त्यांच्या घरी निघून गेले.
मंगळवारी (६ एप्रिल) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भीमा राठोड टेम्पोजवळ गेले त्यावेळी टेम्पोच्या डिझेलच्या टाकीचे झाकण व लॉक तुटलेले दिसले. टाकीतील डिझेल तपासल्यावर टाकीतील अंदाजे ५० लिटर डिझेल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. इतर टेम्पोचालक आले व त्यांनी त्याचे टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोचालक रवी भिल्लू राठोड यांचा टेम्पो (एमएच १२ एसएफ ४५४९), अनिल सुभाष पारडे यांचा टेम्पो (एमएच १२ पीक्यू ६५१०), राजेंद्र सुभाष लांडगे (तिघे रा. कवडीमाळवाडी, ता. हवेली) याचा टेम्पो (एमएच १२ क्यूजी ७५८०) मधील सुमारे प्रत्येकी ५० लिटर व टेम्पो (एमएच १२ क्युजी ७५८०) मधील २२ लिटर डिझेल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.