शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

Pune | भररस्त्यावर स्टंटची रिल्स बनविताना तरुणांनी उडविले, महिलेचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:44 IST

हा अपघात महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील पालखी रोडवर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला

पुणे : सोशल मीडियावर रिल्स बनवून टाकण्याची सध्या सर्व तरुणामध्ये क्रेझ आहे. त्यातूनच भररस्त्यावर रिल्स बनवित असताना मोटारसायकलने शेजारुन जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तस्लिम फिरोज पठाण (वय ३१, रा. गोडगाव, बार्शी, सध्या उरळी देवाची) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील पालखी रोडवर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.

याप्रकरणी पोलीस हवालदार जोतीबा शंकर कुरळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयान आणि झाइद (दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान आणि झाइद हे मोटारसायकलवर स्टंट करीत रिल्स बनवित होते. यावेळी तस्लिम पठाण या दुचाकीवरुन घरी जात होत्या. पालखी रोडवरुन घरी जाण्यासाठी शॉटकट असल्याने तेथून जात होत्या. या रस्त्यावर फारशी रहदारी नसते. त्यामुळे तेथे आयान शेख हा मोटारसायकल चालवत स्टंट करत होता. झाइद हा व्हिडिओ काढत होता. त्याचवेळी आयान याने तस्लिम पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात पठाण या खाली पडून त्यांचा मृत्यु झाला.

हा प्रकार पाहून मदत करण्याऐवजी दोघे पळून गेले. पोलिसांनी केलेल्या तपासात रिल्सच्या नादातून महिलेला जीव गमवावा लागल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड