शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Video: आत्महत्या करण्यासाठी महिलेची थेट पाण्यात उडी; जीवाची पर्वा न करता पोलिसाने वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:05 IST

महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारल्यावर एका पोलिसाने जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले आहेत

पुणे : सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर येथे एक महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी धाडसी कामगिरी करून दाखवली आहे. महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारल्यावर एका पोलिसाने जीवाची पर्वा न करता स्वतः पाण्यात उडी मारून महिलेचे प्राण वाचवले आहेत. सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक शैलेश नेहरकर आणि पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद अशी त्यांची नावे आहेत. तर प्रतीक्षा रोहित कांबळे (वय २७ वर्षे) असे त्या महिलेचे नाव आहे.  मिळालेल्या माहितीनुसर, आज सकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद आणि पोलीस नाईक शैलेश नेहरकर असे मिळून वडगाव मार्शल दिवस पाळी कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना १० वाजून ५८ मिनिटांनी कॉल आला की, तुकाई नगर येथील कॅनॉल मध्ये एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असून त्यांना ताबडतोब पोलिसांची मदत हवीये. कॉल रिसिव्ह करून काशीद आणि नेहरकर दोघे घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा प्रतीक्षा  कांबळे या कॅनॉल समोर उभ्या राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. दोघांनी त्यांना खूप समजण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. कांबळे यांना बोलण्यात व्यस्त करून दोघांनी फायर ब्रिगेडची मदत मागवली. परंतु फायर ब्रिगेड येण्याअगोदरच प्रतीक्षा यांनी पाण्यात उडी मारली. त्यावेळी जीवाची पर्वा न करता वडगाव मार्शल चे अंमलदार पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद यांनी कॅनॉलमध्ये उडी मारून महिलेचे प्राण वाचवले.  आणि महिलेला सुखरूप बाहेर काढले. 

टॅग्स :DhayariधायरीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसWomenमहिलाWaterपाणी