शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला घरात प्रवेश नाकारला अन् पुढं घडलं असं काही की.., न्याय पतीला मिळाला

By नम्रता फडणीस | Updated: May 13, 2023 15:45 IST

पत्नीच्या त्रासामुळे पतीने घट्स्फोटासाठी अर्ज केला तर पत्नीनेही पतीविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल केली होती

पुणे : आठ वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. किरकोळ कारणावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने ती मुलीला घेऊन माहेरी गेली. पत्नीच्या त्रासामुळे पतीने घट्स्फोटासाठी अर्ज केला तर पत्नीनेही पतीविरूद्ध कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल केली. पत्नीची केस प्रलंबित असतानाही पत्नीने माहेरची जागा अपुरी पडत असल्याने पतीने राहत्या घरात राहण्यास जागा द्यावी असा अर्ज केला. मात्र नाते संपुष्टात आले असल्याने एकाच घरात राहिल्यास वादविवाद होतील असा युक्तिवाद पतीच्या वकिलांनी न्यायालयात केला. तो ग्राहय धरीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगांवकर यांनी पत्नीचा अर्ज नामंजूर केला.

राहुल आणि भाग्यश्री (नावे बदलेली) दोघांचे लग्न 2016 रोजी झाले. लग्नानंतर मुलगी झाल्यानंतर किरकोळ कारणांवरुन वाद होऊ लागल्यामुळे  2017 साली नव-याचे घर सोडून पत्नी मुलीला घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. पत्नीच्या त्रासाने 2017 साली पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला तर पत्नीनेही पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. मात्र माहेरची जागा अपुरी पडत असल्याने पतीच्या राहत्या घरात राहण्यास जागा द्यावी असा अर्ज पत्नीने 2022 मध्ये केला. अर्जास पतीने जबाब दिला. न्यायालयात घटस्फोट अर्ज दाखल असून, तो प्रलंबित असल्याने पती पत्नी एकत्र आल्यास घटस्फोट अर्जाचे मूळ कारण संपुष्टात येईल, तसेच पती पत्नी ह्यांच्यातील नाते संबंध 2017 पासून विभक्त राहात असल्याने संपुष्टात आले असल्याचे आहे. जर आता पती पत्नी ह्यांना एका घरात राहण्या बाबत आदेशित केल्यास त्यांच्यात वादविवाद होऊन नवीन तक्रारी व केसेस दाखल होतील आणि लहान मुलीचा विचार करता कि जी एका वर्षा पेक्षा कमी वयाची असतांना आई सोबत राहत आहे अश्या परिस्थिती मध्ये तिच्या मनात संभ्रम निर्माण होईल असा युक्तिवाद पतीच्या वतीने  अँड. राठी यांनी केला. अँड. राठी  यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने पत्नीचा अर्ज नामंजूर केला. प्रकरणात पतीच्या वतीने अँड. अमित राठी आणि अँड अविनाश पवार यांनी काम पहिले. अँड पूनम मावाणी आणि अँड प्राची जोग यांनी सहकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयmarriageलग्नhusband and wifeपती- जोडीदार