शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनाची श्रीमंती अपरंपार... एअरपोर्ट सफाई कर्मचाऱ्याला सापडलं 1 किलो सोन्याचं बिस्कीट, मग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 22:46 IST

१० रुपयांची नोट सापडली तरी माणूस देऊ की नको किंवा कोणाची असले हा विचारीह करत नाही

पुणे/अहमदाबाद - विमानतळावर नेहमीच सोने तस्करी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना उघडकीस येत असतात. त्यामुळे, विमानतळावर उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कार्यरत आणि तत्पर असतात. विदेशांतून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर त्यांची करडी नजर असते. त्यातूनच अनेकदा तस्करखोरांनी लपवलेल्या या-ना त्या मार्गातून ते सोने काढतात. मात्र, पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी कोठेही सोने लवपतात. अहमदाबाद विमानतळावर सफाई कर्मचाऱ्याल असेच फेकून देण्यात आलेले सोन्याचे बिस्कीट सफाई करताना सापडले. या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे ते उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

१० रुपयांची नोट सापडली तरी माणूस देऊ की नको किंवा कोणाची असले हा विचारीह करत नाही. याउलट लगेचच ती नोट खिशात टाकून काढता पाय घेतला जातो. मात्र, एका सफाई कर्मचाऱ्याने दाखवलेला प्रामाणिकपणा खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या गरीबीतही मनाची श्रीमंती दाखवणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्याचं नेटीझन्सकडून कौतुक होत आहे. चिराग परमार असं या सफाई कर्मचाऱ्याचं नाव आहे. 

बीव्हीजे ग्रुपचे प्रमुख हनुमंत गायकवाड यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. 'अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमचे हाउसकीपिंग कर्मचारी चिराग परमार यांना वॉशरूमची देखभाल करताना 1 किलो सोन्याचे बिस्किट सापडले आणि ते त्यांनी प्रामाणिकपणे विमानतळावरील उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना परत केले. त्या १ किलो सोन्याची किंमत जवळपास ५० लाख रु. होते. कठोर गरिबीत राहून देखील आत्यंतिक प्रामाणिकपणा आणि अत्युच्च सचोटीचे उदाहरण चिराग यांनी दाखवून दिले.चिरागजी, तुम्हाला माझा सलाम!, अशी फेसबुक पोस्ट गायकवाड यांनी लिहिली आहे. तसेच, मित्रहो, अशा प्रामाणिक, सच्च्या आणि विनम्र सहकाऱ्यांमुळेच BVG ची प्रगती झाली आहे असे मी मानतो, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, गायकवाड यांनी बीव्हीजे ग्रुपचे ऑपरेशन हेड संजय माने यांना आपल्या पोस्टमध्ये टॅग करुन कृपया रोख पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करा, असेही सूचवले आहे.

टॅग्स :AirportविमानतळPuneपुणेahmedabadअहमदाबादGoldसोनं