शहरं
Join us  
Trending Stories
1
"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
7
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
8
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
9
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
10
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
11
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
12
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
13
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
14
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
15
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
16
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
17
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
18
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
19
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

आयुकाने विकसित केलेल्या दुर्बिणीने टिपली सुर्याची पहिली छबी

By प्रशांत बिडवे | Published: December 08, 2023 10:45 PM

हे यश भारतीय साैर माेहिमेतील मैलाचा दगड मानले जात असून सुर्यावरील वातावरण तसेच पृष्ठभागावर हाेत असलेल्या घडामाेडींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे बाेलले जात आहे.

पुणे : इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फाॅर अ‍ॅस्ट्राेनाॅमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्राेफिजिक्स (आययुका) मधील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्काेप (एसयुआयटी) दुर्बिणीने दि. ६ राेजी पूर्ण सुर्याची छबी टिपण्याची किमया केली आहे. हे यश भारतीय साैर माेहिमेतील मैलाचा दगड मानले जात असून सुर्यावरील वातावरण तसेच पृष्ठभागावर हाेत असलेल्या घडामाेडींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे बाेलले जात आहे.

आदित्य एल-१ हे अंतराळयान श्रीहरीकाेटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर येथून २ सप्टेंबर राेजी सुर्याच्या दिशेने झेपावले हाेते. त्यावर आयुका येथील शास्त्रज्ञांच्या टीमने विकसित केलेले साेलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्काेप एसयुआयटी विकसित केलेली दुर्बिण बसविण्यात आली हाेती. दरम्यान, हे अंतराळयान नियाेजित सुर्य आणि पृथ्वीमधील एल-१ या ठिकाणी पाेहचण्यापूर्वीच दि. २० नाेव्हेंबर राेजी अंतराळ यानावर बसविलेल्या दुर्बिणींची टेस्टिंगला सुरूवात करण्यात आली हाेती. दरम्यान, दि. ६ डिसेंबर राेजी एसयुआयटी दुर्बिणीचे कव्हर उघडताच सुर्याची किरणे टिपत सुर्याची पूर्णाकृती छबी टिपली. त्यामध्ये साैरडाग तसेच चमकणारा भाग म्हणजेच प्लाज दिसून आले आहेत.

एसयुआयटी दुर्बिणीने अतिनिल सुर्यकिरणांमध्ये संपूर्ण सुर्याची चित्र टिपण्याची किमया करून दाखविली आहे. यापूर्वी आशा वातावरणात जगातील काेणत्याही टेलिस्काेप सुर्याचे संपूर्ण चित्र टिपले नव्हते. यापूर्वी इतर देशांनी पाठविलेल्या दुर्बिणींनी सुर्याच्या थाेड्या थाेड्या भागाचे चित्र एकत्रित करून सुर्याचे चित्र तयार केले हाेते. मात्र, आयुकाच्या दुर्बिणीला एकाच वेळी सुर्याचा संपूर्ण चेहरा टिपला आहे. साैरविज्ञान क्षेत्रातील एक अतुलनीय कामगिरी असल्याचे बाेलले जात आहे. आदित्य एल-१ यानावरील सर्व उपकरणांची तपासणी केली जात असून ते व्यवस्थितपणे कार्यरत आहेत. साधारणपणे पुढील एक महिन्यात आदित्य एल- १ हे कक्षेत फिरून नियाेजित ठिकाणी स्थिरावेल आणि त्यानंतर आणखी दर्जेदार फाेटाे पाठवतील. ज्याचा शास्त्रज्ञांना अभ्यासासाठी उपयाेग हाेणार आहे.

सर्यावरील लपलेल्या थरांचे अनावरणएसयुआयटी दुर्बिणीवर ११ विशेष प्रकाश फिल्टर्स बसविले आहेत. त्यातील पहिल्या तीन फिल्टर्सचा वापर सुरू झाला असून सूर्याची पृष्ठभाग आणि वातावरणीय स्तराची उत्तम चित्रे काढली आहेत. अतिनिल किरणांच्या तरंगलांबीमध्येही सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियर उच्च क्षमतेचे चित्रे पाठवू शकतात.

अवकाश दुर्बिणीची संकल्पना सुचणे आणि तीने पहिल्यांदा टिपलेले प्रकाश निरीक्षणे पाहणे ही वैज्ञानिकासाठी आयुष्यभराची संधी असते. अवकाशातील विशिष्ट वातावरणात पहिल्यांदाच एखाद्या अवकाश दुर्बिणीने याप्रकारे संपुर्ण सुर्य चित्रित केला आहे. सुर्याच्या मध्य आणि खालील भागाच्या वातावरणातील बारकावे टिपले आहेत. एसयुआयटी ने पाठविलेली माहिती सौर वातावरणाचा अभ्यासासाठी एक नवीन खिडकी उघडेल आणि आम्हाला सुर्यावरील घडामाेडींची अधिक तपशीलवार माहिती समजून घेण्यासाठी मदत करेल.- प्रा. दुर्गेश त्रिपाठी, मुख्य विश्लेषक, एसयुआयटी 

टॅग्स :Aditya L1आदित्य एल १isroइस्रो