शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

एकतानगरीसाठीचा ३०० कोटींचा निधी राज्यसकारने अद्याप दिलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 09:39 IST

- पालिकेने प्रस्ताव पाठवून महिन्याचा कालावधी होऊनही दखल घेतली नाही

पुणे : एकतानगर विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती व वस्ती यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागांत नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी पुणे महापालिका आयुक्तांनी राज्य सरकाराच्या नगरविकास विभागाकडे केली आहे. याबाबतचा प्रस्ताव २६ जून रोजी पाठविण्यात आला आहे. पण, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही त्यासाठीचा निधी अद्याप आलेला नाही.

शहर व खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे २५ जुलै २०२४ रोजी एकतानगर भागातील अनेक सोसायट्या, दुकानांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे येथील सदनिका आणि दुकाने यांचे विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या मागच्या बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठीचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचबरोबर राज्यसरकारकडे आपत्ती निवारण निधी असतो. १५ व्या वित्त आयोगानुसार एकतानगरी येथे आपत्ती निवारण निधी वापरता येऊ शकतो. त्यानुसार पुणे महापालिकेने या भागासाठी ३०० कोटींचा आपत्ती निवारण निधी दयावा असा प्रस्ताव राज्यसरकारकडे २६ जून २०२५ रोजी पाठविला.पुणे महापालिका नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत आहे. त्याअंतर्गत ११ टप्प्यांपैकी मुठा नदीवर विषयांकीत भागाचा समावेश असलेला वडगांव खुर्द ते राजाराम पूल या भागाचा स्ट्रेच-६ सुमारे ४.१० कि.मी. लांबीचा समावेश आहे. नदी सुधार प्रकल्पाच्या उद्दिष्टापैकी एक उद्दीष्ट पुराच्या पाण्यापासून लगतच्या वस्ती व भागाचे संरक्षण करणे हा देखील आहे. यामध्ये नागरिकांना चालण्यासाठी पाथवे व जॉगिंग ट्रॅक करणे, वृक्ष लावणे, घाट विकसित करणे, नदीला मिळणाऱ्या नाल्यांचा विकसन करणे आदी बाबींचा समावेश आहे. एकतानगर विठ्ठलनगर, निंबजनगर या भागातील इमारती व बस्ती यांचे पुरापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागातील मुठा नदी लगतच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ३०० कोटी निधी द्यावा, असे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नमूद केले आहे. पण, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन त्यासाठीचा निधी अद्याप आलेला नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड