शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

तडीपार गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या; गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत होता शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 16:51 IST

सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

धायरी : तडीपार असतानाही पुन्हा गुन्हा करण्याच्या इराद्याने शहरात आलेल्या गुन्हेगाराला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश मनोज देवे (वय: २२ वर्षे, रा. शिवशंकर मित्र मंडळाजवळ साईनगर, खोराड वस्ती, हिंगणे खुर्द पुणे) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. 

सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अविनाश देवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला पुणे शहर आयुक्त परीक्षेत्र, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. दरम्यान तडीपार असताना देखील त्याने हद्दीत येऊन गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यामुळे पोलीस त्या गुन्ह्यात त्याचा शोध घेत होते. गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास तो हिंगणे खुर्द येथील खोराड वस्तीमध्ये एखादा दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने थांबला असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस नाईक शंकर कुंभार, अंमलदार राहुल ओलेकर व पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना मिळाली. त्यांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.  ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त पौर्णीमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबा उतेकर, पोलीस हवालदार संजय शिंदे, शंकर कुंभार, अमेय रसाळ, विकास बांदल, अमित बोडरे, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, अमोल पाटील, अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.

टॅग्स :DhayariधायरीSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक