शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप

By राजू इनामदार | Updated: October 10, 2024 13:52 IST

६५ वर्षांवरील महिला तुमच्या बहिणी नाहीत का? मतदार म्हणून त्या फारशा प्रभावी राहणार नाहीत अशी भीती तुम्हाला वाटते का? मनसेचा सवाल

पुणे: सरकारच्या लाडकी बहिण योजनेत बहिणींबाबत दुजाभाव केल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनाधिकार सेनेने केली. ६५ वर्ष वयांवरील महिलांना ही योजना लागू होत नाही. या वयातील महिला तुमच्या बहिणी नाहीत का? किंवा मतदार म्हणून त्या फारशा प्रभावी राहणार नाहीत अशी भीती तुम्हाला वाटते का? असे प्रश्न जनाधिकार सेनेने उपस्थित केले आहेत.

सरकारच्या या लाडकी बहिण योजनेत वयाची अट टाकण्यात आली आहे. ६५ वर्ष वय असणाऱ्या महिलांना ही योजना लागू नाही. त्यांना यात सहभागी करून घेण्यात येणार नाही. जनाधिकार सेनेचे राज्य अध्यक्ष हेमंत संभूस यांनी सांगितले की ही अट अनाकलनीय आहे. सरकार जनतेबाबत कोणताही दुजाभाव करणार नाही अशी शपथ मुख्यमंत्र्यांपासून प्रत्येक मंत्ऱ्याला घ्यावी लागते. तरीही या योजनेत ही अट टाकण्यात आली. यातून सरकारनेच महिलांचे दोन गट केले असल्याचे दिसते. हा दुजाभावच आहे. वास्तविक या वयातच वैद्यकीय, कौटुंबिक अशा अनेक अनेक अडचणीसाठी महिलेला मदतीच्या हाताची गरज असते. ६५ वर्षे वयावरील महिलांसाठी दुसऱ्या सरकारी योजना आहेत असे सांगण्यात येते, मात्र त्या योजनेत पात्र होण्यासाठीच्या अटी किचकट आहे, कागदपत्र, वयाचा दाखला, निराधार असल्याचा दाखला अशा इतक्या किचकट गोष्टी आहे की महिला त्या वाटेला जातच नाहीत. त्यामुळे सरसकट दरमहा १५०० रूपये देणाऱ्या या योजनेची खरी गरज याच ६५ वर्षे वयापुढील महिलांना आहे असे संभूस म्हणाले. सरकारची मुदत आहे तोपर्यंत सरकारने ही बदलावी अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेWomenमहिलाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाMONEYपैसा