शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नदी सुधारची वल्गना; पण शेजारीच पवना फेसाळली..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:28 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्ताच नाही : महापालिका पर्यावरण विभाग घेतोय शोध

विश्वास मोरे पिंपरी : पवना नदीतीरावर चिंचवड येथे महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी सायंकाळी सुरू होता. व्यासपीठावर नदी सुधार योजनेची वल्गना होत असतानाच काही अंतरावर असलेली पवना नदी फेसाळली होती, दुर्गंधी येत होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदी फेसाळल्याचा पत्ताच नसल्याचे दिसून आले; तर नदी कशामुळे फेसाळली, याचा महापालिका पर्यावरण विभाग शोध घेत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना नदी वाहते. किवळे-रावेतपासून दापोडीपर्यंत २४.२ किलोमीटरचे पात्र आहे. गेल्या दोन वर्षांत नदी फेसाळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही.

चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी तीर्थक्षेत्र विकासावर भाष्य केले. देहू, आळंदी आणि शहरातील तीर्थस्थळांचा कॉरिडॉर करता येईल, अशी संकल्पना मांडली. पवना नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार झाला. त्यामुळे नदीप्रदूषण कमी होईल, याची माहिती दिली. महोत्सवात नदी सुधारची वल्गना होत होती, त्याच वेळी कार्यक्रमस्थळापासून तीनशे मीटरवर पवना नदी फेसाळली होती.

नदी फेसाळण्याचे कारण सापडेना

थेरगाव बोट क्लब येथील केजूदेवी बंधाऱ्यापासून चिंचवड पुलापर्यंतच्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर फेस दिसून आला. नदी वर्षात चार वेळा फेसाळली आहे. ती कशामुळे फेसाळत आहे, याचे कारण गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. मंगळवारी बोट क्लबपासून चिंचवडपर्यंत नदीपात्र फेसाने आच्छादल्याचे दिसून आले. याबाबत प्रदूषण असेल तर माहिती घेऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पवना नदीला फेस आला आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर महापालिकेतील पर्यावरण विभागाचे पथक पाहणीसाठी पाठवले आहे. कशामुळे नदीला फेस आला याचा शोध घेतला जाईल व त्यावर उपाययोजना केली जाईल. - संजय कुलकर्णी, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेwater pollutionजल प्रदूषण