शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पुणेकरांची झोप उडाली, धो धो कोसळला; झाडेही उन्मळून पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 09:57 IST

पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक भाग पाणी शिरलं आहे

पुणे  - राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुणेकरांना सोमवारी मध्यरात्री चांगलंच झोडपलं आहे. पुण्यातील मुख्य बाजारपेठेला नदीचे स्वरुप आले होते. तर दगडूशेठ गणपती मंदिरातही पाणी साठलं होतं. येथील कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत मंदिरातील पाणी बाहेर काढण्याचं काम केलं. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीचा मोठा प्रवाह वाहत होता. या प्रवाहात काही ठिकाणी गाड्याही वाहिल्याचे व्हिडिओ आता समोर येत आहेत. एकूणच पुण्यातील पावसाने पुणेकरांची झोप उडाल्याचं पाहायला मिळालं. 

पुण्यात झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक भाग पाणी शिरलं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे, शेती पिकांचेही नुकसान झाल्याचे समजते. येवलेवाडी स्मशानभूमीजवळ सुखसागर नगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड, अग्निशमन केंद्र समोर हडपसर, गाडीतळ या भागात चांगलंच पाणी साचलं होतं. तर, काही भागात झाडेही उन्मळून पडली आहेत.

पुण्यातील पावसाचे व्हिडिओ आणि फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. त्यासोबतच, पडत्या पावसात एकमेकांच्या मदतीला येणारे पुणेकरही दिसून आले. एकंदरीतच पुण्याचा रात्रीचा पाऊस यंदाच्या पावासाळ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस झाल्याचं समजत आहे. 

दरम्यान, शिवाजीनगर परिसरात रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.कोंढवा खुर्द भाजी मंडई येथे एका ठिकाणी पाण्यात 7 नागरिक अडकले होते. यामध्ये 5 मोठे नागरिक आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. त्यांना रश्शीच्या साह्यानं सुखरुप बाहेर काढलं आहे. मंगळवार पेठेतही पाणी शिरलं होतं. सदाआनंदनगरमधून पाच जणांना सुखरुन बाहरे काढलं आहे. यामध्ये  3 लहान मुली 1 महिला 1 पुरुष होते. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMumbaiमुंबई