शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालगंधर्वांनी उंचीवर नेलेली संगीत रंगभूमी पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 10:08 IST

बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

पुणे : कोणतीही संस्कृती ही प्रवाही नदीसारखी असते. ती नदी प्रवाहित राहिली तरच ती नित्यनूतन आणि चैतन्यमयी राहते. बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे, असे मत माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी- पाटील यांना, तर ''कोहिनूर गंधर्व'' पुरस्कार प्रसिद्ध गायक पं. कैवल्यकुमार गुरव यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रभू बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, बालगंधर्व संगीत रसिक एम मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, उमा सुरेश प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. रुपये एक लाख ११ हजार असे बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचे, तर रुपये ५१ हजार असे ''कोहिनूर गंधर्व'' पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी सुरेश साखवळकर यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, तर अवंती बायस यांना माणिक वर्मा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश प्रभू यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, बालगंधर्वांनी संगीत नाट्याला वेगळा आयाम प्राप्त करून दिला. बालगंधर्वांनी संगीत रंगभूमीवर स्वतः तर प्रेम केलेच; परंतु त्यांनी रसिकांनाही संगीत नाटकांवर प्रेम करायला शिकवले. बालगंधर्व हे संगीत रंगभूमीवरील दैवदुर्लभ व्यक्तिमत्त्व होते. संगीत रंगभूमीचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर समाज प्रबोधनासाठी देखील त्यांनी केला.पंडित उल्हास कशाळकर म्हणाले की, पूर्वी शास्त्रीय संगीत केवळ राजे रजवाड्यांमध्येच ऐकले जायचे. ते सर्वसामान्यांसाठी खुले नव्हते. संगीत रंगभूमीच्या माध्यमातून नाट्यगीतांद्वारे शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. संगीत नाट्य रंगभूमीने शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड