शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावर चढलेल्या मनोरुग्नाला पुलावर उतरवण्यात लोहमार्ग पोलिसांना यश 

By अजित घस्ते | Updated: May 23, 2024 19:18 IST

लोहमार्ग पोलिसांनी रेस्क्यूद्वारे त्याला खाली उतरवून यशस्वी कामगिरी बजावली.

पुणे: रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फूट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास संजय कुमार दरोगी-शर्मा (वय २८) मनोरुग्ण चढला होता. त्यामुळे पुणे स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता.परंतु लोहमार्ग पोलिसांच्या टीमकडून रेस्क्यूद्वारे या रुग्णाला मोठ्या शितफिने खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्याला भावाकडे सुपूर्द करण्यात आले. परंतु अशा व्यक्ती रेल्वे स्थानकात कसे येतात, त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येते आहे. सकाळी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. त्याच वेळी मनोरुग्ण पुलावर चढल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तसेच पादचारी पुलावर विद्युत तारा असल्यामुळे रेस्क्यू करताना अडचणी येत होत्या. परंतु लोहमार्ग पोलिसांच्या टीमने मोठ्या शिताफिने त्याला पकडण्यात आले. ही घटना नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर घडली. या पुलाला लागूनच मेट्रोचे नवीन स्थानक आहे. त्यातून अथवा रेल्वेच्याच परिसरातून हा मनोरुग्ण वर चढला होता, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता. त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वेकडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात, असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुनिल कदम, आनंद कांबळे, अनिल टेके, निलेश बिडकर, पोलीस शिपाई विकम मधे, नेमाजी केंद्रे या टीमने केले आहे. सकाळी दहाच्या सुमारास मनोरुग्ण पादचारी पुलावर चढल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लोहमार्ग टीमकडून रेस्क्यूद्वारे त्या मनोरुग्णाला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्याच्या चुलत भावाकडे सुपूर्द करण्यात आले. - राजेंद्र गायकवाड, लोहमार्ग वरीष्ठ पोलीस निरीक्षक

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे