शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

बारामतीतील सुपे भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतीये; नगरपंचायतीबाबत विचार होणार, अजित पवारांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 18:21 IST

सुप्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांचे एकमत असेल तर सुप्यात नगरपंचायत होऊ शकते असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले

सुपे : पश्चिम पट्टयातील जिरायती भागातील सुप्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांचे एकमत असेल तर सुप्यात नगरपंचायत होऊ शकते असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सुपे येथे विविध विकास कामांचे भुमिपुजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर होते. 

पवार म्हणाले, पुर्वी बसचा पास ७० रुपये ऐवढा होता. मात्र आता तो पास परवडत नसल्याने बंद करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या प्रवाशांना या पासचा लाभ मिळणार आहे. ७०० कोटीचा तोटा पीएमपीएलला सहन करावा लागत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलमुळे हवेत प्रदूषण होत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक बस सुरु कराव्या लागतील तरच महामार्गावर बसेस दिसतील असे पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पुणे जिल्हा बॅंक शुन्य टक्के व्याज दराने पीक कर्ज देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजपंपाची थकबाकी ठेवु नये. यावर्षी जिल्हा बॅंकेने ३ हजार ८०० कोटी पीक कर्ज दिले. तर आता ४ हजार कोटी पीककर्ज देण्याचे उद्दिष्टे जिल्हा बॅंकेचे आहे. मयुरेश्वर पतसंस्थेतर्फे १५ टक्क्यापेक्षा कमी व्याज दराने कर्ज दिले पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केले.        सुप्यात महिला पोलिस सेंटर उभारण्याचा मानस असुन त्यासाठी याठिकाणी १०० एकर जागा शोधण्याचे काम सुरु आहे. विकास कामे करित असताना ते दर्जेदार व्हावीत असा मानस पवार यांनी व्यक्त केला. येथील ओपन जिम पाहुन नाराजी व्यक्त केली. तर ग्रामीण भागात वीजेची बचत कशी करावी समजत नाही. त्यामुळे यापुढे हायमास दिवे देण्याचे शासनाने बंद केले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. तसेच येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चा व्हावा यासाठी मंत्रालयातुन पाठपुरावा करणार आहे. तर सुपे तलावाचे सुशोभीकरण करण्याबाबतही प्रांतअधिकारी यांना सुचना देण्यात आल्या. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीSocialसामाजिक