राजगुरूनगर: पाडळी (ता खेड ) येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ३ जणांना खेडपोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह एक टेम्पो जप्त करण्यात आला. ( दि १३ ) रोजी गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या अटकेमध्ये सुरज तुकाराम लावंड (वय २८ रा. मोशी ,ता हवेली ), जीत गिरीश चांदणे (वय १९ रा. भोसरी पुणे ), जीवनसिंग अमरसिंग काकरवाल (वय २९ रा. पिंपरी पुणे ) यांचा समावेश असून दोन आरोपी फरार झाले आहेत. पाडळी परिसरातील चासकमान धरणाच्या कालवा परिसरात टेम्पो घेऊन चार ते पाच जण चोरीच्या उद्देशाने फिरत होते. याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी खेड पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ जाऊन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून कटावणी, ब्लेड, रॉड, मिरचीपूड असे साहित्य मिळून आले. सदर टोळीकडून भविष्यात घडणा-या अनेक गुन्ह्यांवर प्रतिबंध बसणार असून त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.
दरोडाच्या तयारीतील तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले; गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2023 19:23 IST