शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

SPPU: पुणे विद्यापीठात रंगणार आदिवासी कथेवरून प्रेरित 'संगीत कमली की सत्त्वपरीक्षा' नाटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 14:07 IST

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ललित कला केंद्राकडून आयोजित प्रयोगाला प्रवेश विनामूल्य

पुणे : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत 'संगीत कमली की सत्वपरीक्षा अर्थात ह्यो रिश्ता क्या कहलाता है ?' या नाटकाचा पहिलाच प्रयोग दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सं. ७ वा. विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात होईल. साधारणपणे लोककला प्रकाराच्या अंगाने उभ्या केलेल्या या नाट्यात नौटंकी आणि दशावताराचा मिलाफ आहे.

विवाहसंस्थेला धरून पूर्वापार चालत आलेले सामाजिक संकेत आणि सर्वमान्य चौकटी माणूस जनरीत म्हणून स्वीकारतो. तथाकथित सुसंस्कृत बनून राहण्यासाठी, नातं टिकवून ठेवण्याच्या हट्टात;  स्वतःशीच चाललेल्या झगड्याला आणि त्यातून होणाऱ्या दमनाला हे नाट्य अधोरेखित करतं. प्रेक्षकाला प्रश्न विचारू पाहतं. हे नाटक एका आदिवासी कथेवरून प्रेरित असून त्याचे लेखन शंतनू अडसूळ व दिग्दर्शन महेश खंदारे यांनी केले आहे.

 ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रम अर्थात रेपर्टरी; ही भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य तसेच पारंपारिक व समकालीन नाटक महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तसेच सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने सुरू करण्यात आली. या अंतर्गत 'अपवाद आणि नियम' आणि 'वाघाची गोष्ट' यानंतरचं हे तिसरं नाटक असल्याचे ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी सांगितले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठartकलाcinemaसिनेमाcultureसांस्कृतिकEducationशिक्षण