शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

एकत्रीकरणाचे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

By राजू इनामदार | Updated: May 8, 2025 18:28 IST

दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. आमच्या पक्षात काही जणांना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर

पुणे : ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण झाले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हा निर्णय आमच्या पक्षातील नव्या पिढीने, खासदार सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, मी त्या प्रक्रियेत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी (दि. ८) अनौपचारिकपणे झालेल्या चर्चेत सांगितले. एकत्रीकरणावर खुद्द शरद पवार बोलले असल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांची गुरुवारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंबंधीची विधाने केली.पवार म्हणाले, दोन्ही पक्षाचे नेते एकाच विचारधारेतील आहेत. आमच्या पक्षात काही जणांना वाटते, विकासकामे व्हायची असतील तर अजित पवार यांच्याबरोबर जावे, काहींना वाटते जाऊ नये. एकत्र यायचे की नाही याचा निर्णय पक्षातील नव्या पिढीने घ्यायचा आहे. आमच्या खासदार सुप्रिया सुळे यासंदर्भात निर्णय घेतली. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाहेर झालो आहे.आमची मंडळी विविध पक्षांत विभागली गेली आहेत तरीही विचाराने मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्या दिल्लीतील खासदारांविषयीही बोलले जाते, मात्र आम्ही सगळे एकाच विचारांचे आहोत असे पवार यांनी या चर्चेत स्पष्ट केले. एकत्रीकरणासंबंधी विचारले असता त्यांनी याचा निर्णय नवी पिढी घेईल याचा पुनरुच्चार केला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे