शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नराधम बापाने पोटच्या लेकीवरच टाकला हात; वडगाव शेरी परिसरातील धक्कादायक घटना

By नितीश गोवंडे | Updated: March 23, 2024 15:13 IST

याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २२) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....

पुणे : शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक घटनांमध्ये ओळखीचे, नातेवाईकच महिला-मुलींवर अत्याचार करत असल्याचे देखील दिसून येत आहे. अशाच एका घटनेत १६ वर्षीय मुलीवर तिच्या ४० वर्षीय बापानेच सातत्याने अत्याचार केल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २२) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हर असून त्याने स्वत:च्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. आरोपीने पीडित मुलीला मारहाण करुन घरी कोणी नसताना वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला गोळ्या खायला दिल्या. मुलीने गोळ्या खाल्ल्या नाही तर तो जबरदस्तीने तिला गोळ्या खायला घालत होता. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर आई, बहीण व भावाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांना मारून टाकीन अशी देखील धमकी नराधम देत होता.

शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केले. बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून तिने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन नाराधम बापाला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड