शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आई ती आईच; बिबट्याचं तोंड दाबून धरलं, ८ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला वाचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:59 IST

कुशीत झोपलेल्या ८ महिन्याच्या मुलाला बिबट्या घेऊन जात असताना आईने केला प्रतिकार अन् मुलाला वाचवले

विलास शेटे

मंचर: आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या मुलाला बिबट्याने हात तोंडात धरत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आईने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या हल्ल्यातून पोटच्या गोळ्याला वाचविले आहे. देवा करगळ असे वाचलेल्या मुलाचे नाव आहे. ही थरारक घटना आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणेमळ्यात आज पहाटे घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा छोटा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील फुटाणेमळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाउ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिचा आठ महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याचे बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता देवा या मुलाचा हात अंथुरणाच्या बाहेर आला होता. त्यावेळी मेंढ्यांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या बाजूलाच दबा धरून बसला होता. या बिबट्याने हल्ला करण्याच्या उद्देशाने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सोनल करगळ यांना जागा आली. तिने मुलाला ओढत असलेल्या बिबट्याला प्रतिकार केला. एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. या दरम्यान जोरजोरात आरडाओरडा केला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनीही आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात आठ महिन्याचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत. 

घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी बिबट रेस्क्यू सदस्य यांनी मेंढपाळ कुटुंब यांना धीर देत मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलावर मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन कर्मचाऱ्यांनी सकाळी येऊन घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दोन दिवसापूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे.मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस  म्हणाल्या हा परिसर बिबट्या प्रवन क्षेत्र असल्यामुळे मेंढपाळांनी रात्रीच्या वेळेस झोपताना खबरदारी घ्यावी ज्या ठिकाणी विजेची  व्यवस्था असेल त्या ठिकाणी झोपावे व कुटुंबातील सदस्यांनी राखणदारी करावी. असे आवाहन राजहंस यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याambegaonआंबेगावSocialसामाजिकforest departmentवनविभाग