शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल चालकाने डॉक्टरांना लावली पैशांची चटक! ससूनमध्ये थेट सांगतात...बाहेरून औषधे आणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 10:43 IST

Sassoon Hospital News: शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर बाहेरून साहित्य आणल्याचे सांगत नातेवाइकांच्या हातात खासगी बिल टेकवायचे आणि जवळच असलेल्या खासगी मेडिकलकडे भरायला सांगायचे. त्यातून ‘टक्के’वारीचे गणित जुळवत महिन्याला लाखाे रुपये कमावण्याचा प्रकार ससूनमध्ये तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे.

पुणे -  शस्त्रक्रिया ठरली तर पेशंट व नातेवाइकांना सांगायचे की रुग्णालयात सर्वच मेडिकल, साहित्य मिळत नाहीत. काही बाहेरून विकत घ्यावे लागते. शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा शस्त्रक्रिया झाल्यावर बाहेरून साहित्य आणल्याचे सांगत नातेवाइकांच्या हातात खासगी बिल टेकवायचे आणि जवळच असलेल्या खासगी मेडिकलकडे भरायला सांगायचे. त्यातून ‘टक्के’वारीचे गणित जुळवत महिन्याला लाखाे रुपये कमावण्याचा प्रकार ससूनमध्ये तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे.

व्हिडीओनंतर पर्दाफाश- ससून रुग्णालयातील न्यूराेसर्जरी विभागातील निवासी डाॅक्टरने रुग्णांच्या नातेवाइकांकडे साडेचाेवीस हजार रुपये मागितल्याचा  व्हिडीओ समाेर आला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. - ससून रुग्णालयापासून जवळच असलेल्या जसपाल नावाच्या खासगी मेडिकल चालकाने येथे अशा प्रकारे पैसे कमावण्याचा जम बसवला आहे. - त्याच्या धंद्यासाठी त्याने निवासी डाॅक्टरांना हाताशी धरत, त्यांना टक्केवारीचे आमिष दाखवत रुग्णांकडून पैसे कमावण्याचा धंदा जाेरात सुरू केला आहे. काही डाॅक्टर त्याला बळी पडत आहेत. 

दिवसाला लाखाेंची मायाससून रुग्णालयात १४ ते १५ ऑपरेशन थिएटर आहेत. येथे दरराेज लहान माेठ्या अशा ७० ते ८० शस्त्रक्रिया हाेतात. ऑर्थाे, न्यूराे, सर्जरी विभागातील निवासी डाॅक्टरांना हाताशी धरून या खासगी मेडिकल चालकाने त्याचे चांगलेच बस्तान बसवले आहे. किमान निम्म्या शस्त्रक्रियेसाठी पाच-पाच हजार असे पकडले तरी त्याची बेरीज ही लाखाेंच्या पुढे जाते. 

डिलिव्हरी बॉयया खासगी मेडिकल चालकाकडे ससूनमधील डॉक्टरांनी यादी पाठवण्यापूर्वी याची कल्पना रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना देण्यात येते.  यादी या मेडीकल चालकाकडे व्हॉटस्ॲपवर पाठवली जाते. त्यानंतर डिलिव्हरी बॉय तत्काळ औषधे आणून देतो. त्यानंतर रुग्णाला ऑनलाइन पेमेंट करायला सांगितले जाते.असे अनेक डिलिव्हरी बॉय कामाला आहेत.

या प्रकरणाची चाैकशी करण्यात येत आहे. संबंधित पैसे मागणारा डाॅक्टर न्यूराेसर्जरी विभागातील कनिष्ठ निवासी डाॅक्टर आहे. दाेन ते चार दिवसांत चाैकशी पूर्ण हाेईल व त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल.-चाैकशी समितीमधील एक वरिष्ठ डाॅक्टर 

टॅग्स :sasoon hospitalससून हॉस्पिटलPuneपुणेCorruptionभ्रष्टाचार