शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime | पैसे डबल करून देण्याचे आमिष; दौंडमध्ये महिलेची ३५ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 15:30 IST

सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, अशी एकूण ३५ लाख रुपयांची फसवणूक...

दौंड (पुणे) : येथे एका महिलेला डबल पैसे करून देण्याचे आमिष दाखवून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम, अशी एकूण ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोजेस उजागरे (रा. गजानन सोसायटी, दौंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधा साळवे (रा. गजानन सोसायटी दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

दि. ३ ऑगस्ट २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी टप्प्याटप्प्याने १५ लाख ४८ हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. दरम्यान, आरोपीने फिर्यादीकडे पुन्हा पैशाची मागणी केल्यानंतर फिर्यादीने पैसे देण्याचे बंद केले. परिणामी, दिलेली रक्कम परत द्यावी म्हणून मोजेसकडे तगादा लावला. तेव्हा मोजेस फिर्यादीने मला अजून पैसे दिले नाही तर आहे ते पैसे देखील तुम्हाला मिळणार नाहीत. तसेच तुमच्याकडील सोन्याचे दागिने द्या, ते मी गहाण ठेवतो आणि तुम्हाला सर्व पैसे आणून देतो, असे सांगितले. त्यानुसार संबंधित महिलेने मोजेला ३९ तोळे सोन्याचे दागिने दिले. मात्र, रोख रक्कम आणि दागिने अद्याप परत मिळाले नसल्याने संबंधित महिलेने पोलिसात फसवणुकीची तक्रार केली.

टॅग्स :daund-acदौंडPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी