शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पोलिसांनी सील केलेल्या ‘द लिक्विड लिझर लाऊंज’ बारची पतित पावन संघटनेकडून तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 14:27 IST

एफसी रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली...

पुणे : पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या एल ३ बारची तोडफोड करण्यात आली आहे. पतित पावन संघटनेकडून करण्यात ही तोडफोड केली आहे. पुण्यातील याच बारमध्ये काल काही तरुण ड्रग्सचे सेवन करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या प्रकरणी ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आज (सोमवार) या बारच्या पाटीची तोडफोड करण्यात आली. 

एफसी रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर रविवारी व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा पब सील करण्याचे आदेश दिले. ‘झीरो टॉलरन्स’वर हे प्रकरण गांभीर्याने हाताळले जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

या व्हिडीओमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या व्हिडीओमध्ये दिसणारी वेळ मध्यरात्री दीडनंतरची असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटेपर्यंत पब सुरू असल्याचा आरोपसुद्धा करण्यात येत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणी नगरसह शहरातील विविध भागांतील पबवर कारवाईचा बडगा उगारला. फर्ग्युसन रोडवरील ‘द लिक्विड लिझर लाऊंज’ (एल ३) हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता. यावेळी स्वच्छतागृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा केला जात आहे. त्याठिकाणी ड्रग्जचे सेवन केले गेले की नाही, या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चाैकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पबमध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्यविक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड वाजेनंतर पब सुरू ठेवू नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पबचालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हिडीओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड