शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अडकलेल्या ‘त्या’कृषी अधिकाऱ्यांची चौकशी आता स्वतंत्र समितीमार्फत; उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:54 IST

या प्रकरणांमध्ये उच्चपदस्थ कृषी अधिकारी असल्याने त्यांची चौकशी समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून न करता दांगट यांच्याकडे चौकशी सोपवावी, अशी विनंती कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केली होती.

पुणे : कृषी विभागातील विविध योजनांमधील गैरव्यवहार तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच सुरू केलेल्या बेकायदा कृषी निविष्ठा व उत्पादक कंपन्या आणि विक्री केंद्रे यांच्या चौकशीसाठी आमदार सुरेश धस यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. अखेर याची दखल घेत आता राज्य सरकारने माजी सनदी अधिकारी व कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. या प्रकरणांमध्ये उच्चपदस्थ कृषी अधिकारी असल्याने त्यांची चौकशी समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून न करता दांगट यांच्याकडे चौकशी सोपवावी, अशी विनंती कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केली होती. समितीला एका महिन्यात अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे.

धस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाच ते सहा प्रकरणांत तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार याबाबत कृषी विभागातील संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचे काम सोपविण्यात आले होते. या तक्रारींचे स्वरूप पाहता, त्यामध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांची व्याप्ती मोठी आहे. तसेच, काही तक्रारींमध्ये कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत.ही बाब लक्षात घेता, तक्रारीमध्ये नमूद अधिकाऱ्यांच्या समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी देणे योग्य होणार नाही. याशिवाय, तक्रारीमधील मुद्यांची व्याप्ती मोठी असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांना या चौकशीसाठी नेमल्यास त्यांचे नियमित कामकाज बाधित होणार आहे. तसेच आलेल्या तक्रारींचे स्वरूप आणि गांभीर्य पाहता, चौकशी त्वरित होऊन तातडीने निष्कर्ष निघणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारींची चौकशी कार्यालयीन कार्यपद्धती अवगत असणाऱ्या व विषयाची जाण असणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. उमाकांत दांगट यांच्याकडे चौकशीचे कामकाज वर्ग करण्याची विनंती मांढरे यांनी केली होती. त्यानुसार या समितीच्या स्थापनेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष चौकशी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून चौकशी अहवाल एका महिन्यात आयुक्तांकडे सादर करावा, असेही सुचविण्यात आले आहे.

 चौकशी अधिकारी सध्या खरीप हंगामाच्या नियोजनात गुंतले असल्याने त्यांना या चौकशीसाठी स्वतंत्र वेळ मिळत नव्हता. त्यामुळे चौकशीला विलंब होण्याची शक्यता होती. त्यामुळेच याबाबत राज्य सरकारला चौकशीसाठी स्वतंत्र पूर्णवेळ समिती नेमण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार ही समिती नेमण्यात आली आहे. - सूरज मांढरे, आयुक्त कृषी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड