शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ऑम्लेट बनवता येत नाही म्हणून नवऱ्याने दाबला बायकोचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 15:55 IST

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिस हवालदाराला अटक...

धनकवडी (पुणे) : पत्नीला ऑम्लेट नीट बनवता येत नाही म्हणून तिचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न केला. मुलगा सोडविण्यासाठी गेल्यानंतर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पती-पत्नीने परस्परविरोधी तक्रार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

मनिष मदनसिंग गौड (५०, दत्तविहार सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) असे खूनाचा प्रयत्न आणि मारहाण करणाऱ्या पतीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारा पती पोलीस हवालदार असून या प्रकरणी संबधित पोलिस हवालदारालाच भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष गौड पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तो आंबेगाव बुद्रुक येथील दत्तविहार सोसायटीमध्ये राहण्यास आहे. बुधवारी (दि. १९) ऑक्टोबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास मनिष यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी ऑम्लेट बनवले. बनविलेल्या ऑमलेटमध्ये काहीतरी बिघाड असल्याने मनिष हा पत्नीवर ओरडला. मोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. तुला ऑमलेटही नीट बनवून देता येत नाही का, असे म्हणत त्यांच्या अंगावर धाऊन गेला.

हाताने मारहाण करून फ्रिजवर ठेवलेली इलेक्ट्रॉिनीक पक्कड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. फिर्यादीला खाली पाडून त्यानंतर दोन्ही हातने फिर्यादीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याला लाथाबुक्क्यानी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन धामणे करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी