शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

VIDEO: "रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" बेलवाडीत पहिले अश्व रिंगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 09:34 IST

अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली...

रविकिरण सासवडे / पोपटराव मुळीक बारामती / लासुर्णे : "रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, देह दंगे सावळ्याच्या अंगणी" देहभान विसरवणारा, सावळ्याच्या विठूच्या चरणी लीण करणारा, शिण घालवणारा, चैतन्याचा झरा म्हणजे रिंगण सोहळा. टाळ मृदंगाचा होणारा गजर आणि विठूनामाचा जयघोष लहान-थोरांचां दांडगा उत्साहाने रिंगण सोहळ्याची भव्यता उत्तरोत्तर वाढवली. जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे  मंगळवारी (दि. २०) मोठ्या उत्साहात पार पडले.

'नाम तुकोबाचे घेताडोले पताका डौलातअश्व धावता रिंगणीनाचे विठू काळजात'

अशी भावना अश्व रिंगणाचा अनुपम्य सोहळा अनुभवताना, ‘रामकृष्ण हरीचा जयघोष’ करताना वारकरी गहिवरले होते. रिंगण सोहळ्याला पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसह इंदापूर, बारामती, माळशिरस, नातेपुते आदी भागातील लाखो ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचं पारणं फेडले. सणसर येथील मुक्कमानंतर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिल्या अश्व रिंगणासाठी बेलवाडी येथे ‘ज्ञानोबामाऊली-तुकाराम’ अशा जयघोषात आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच रिंगणस्थळावर भाविकांनी गर्दी केली होती.

अश्व रिंगण सोहळ्याची सुरूवात अक्षय मचाले यांच्या मानाच्या मेंढ्यांच्या रिंगणाने झाली. यानंतर टाळकरी, पोलिस होमगार्ड, विणेकरी, तुळसी वृंदावन धारक महिला, झेंडेकऱ्याचे रिंगण पार पडले. यावेळी  विठू नामाच्या गजरात रिंगणासाठी धावताना अबाल-वृध्दांचे भान हरपले.

वारकरी भाविकांनी रिंगण सोहळ्या दरम्यान अलिखित शिस्तबद्ध नियमांचे दर्शन घडवले. यानंतर मानाच्या अश्व रिंगणाला सुरूवात होताच उपस्थित लाखो भाविकांनी ज्ञानोबा-तुकाराम चा एकच जयघोष केला. या जयघोषाने अवघे आसमंत दुमदुमले. यावेळी अश्व पुढे जाताच त्याच्या चरणी असणारी रज भाळी लावण्यासाठी एकच झुंबड उडाली. यानंतर महिला-पुरूषांनी फुगड्यांचे फेर धरले. तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा ठेका धरला.

विठ्ठलाच्या दारी कोणी लहान-थोर नाही. या भावनेने प्रत्येकजण एकमेकाच्या पाया पडत होते. रिंगण सोहळ्यानंतर येथील हनुमान मंदिरामध्ये पालखी सोहळा विश्रांतीसाठी विसावला. तत्पूर्वी  तहसीलदार श्रीकांत पाटील, सोहळा प्रमुख संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. भानुदास महाराज मोरे, ह.भ.प. संजय महाराज मोरे, ह.भ.प. अजित महाराज मोरे, ह.भ.प. अभिजित महाराज मोरे देहु संस्थान, बैलजोडी मानकरी महेंद्र झिंर्जुडे, दादासाहेब शेळके, शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, आमदार दत्तात्रय भरणे, कांतीलाल जामदार, सर्जेराव जामदार  सरपंच मयुरी शरद जामदार, उपसरपंच नामदेव इतापे, शहाजी शिंदे, पंकज जामदार, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, उपनिरीक्षक अतुल खंदारे, अ‍ॅड. शुभम निंबाळकर आदींनी पालखी रथाचे स्वागत केले.  पालखी रिंगण सोहळ्यासाठी मोठ्या  प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी