पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचा गौरव करत उदयनराजे भोसले यांनी इतिहासातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला.उदयनराजे म्हणाले, "एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं."
‘थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली, महात्मा फुलेंकडून अनुकरण’ उदयनराजेंचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:08 IST