शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व रिंगरोडची मोजणी आठ दिवसांत पूर्ण होणार; मोजणीला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 20:44 IST

पहिल्या टप्प्यातील पश्चिम रिंगरोडसाठी लवकरच खरेदीखत सुरू होणार

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याबरोबरच जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणा-या रिंगरोडच्या दुस-या टप्प्यातील पूर्व रिंगरोडच्या जमिन मोजणी प्रक्रीयेला गती मिळाली असून, पुढील आठ दिवसांत संपूर्ण मोजणी प्रक्रिया पूर्ण होईल. याचबरोबर पहिल्या टप्प्यातील 37 गावांपैकी 32 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. यापैकी काही गावांमध्ये लवकरच खरेदीखत सुरू करण्यात येणार आहेत. 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम असे दोन टप्प्यात हा रिंगरोड करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम भागातील रिंगरोडसाठीची जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 37 गावांपैकी 36 गावांची मोजणी पूर्ण झाली असून, या पैकी 32 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. तर 7 गावांचे दर अंतिम झाले आहेत. या गावांमध्ये लवकरच खरेदीखत सुरू करण्यात येणार आहे. तर दुस-या टप्प्यातील पूर्व रिंगरोडची मोजणी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. येथे 46 पैकी 19 गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. आठ दिवसांत 9 गावांची मोजणी पूर्ण झाली असून, शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच पुढील आठ दिवसांत म्हणजेच 22 एप्रिल पूर्वी सर्व गावांची मोजण पूर्ण करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

''जिल्ह्याच्या विकासाठी महत्वपूर्ण ठरणा-या रिंगरोडची पहिल्या टप्प्यातील मोजणी पूर्ण झाली असून,  दुसर्‍या टप्प्यातील मोजणी येत्या आठ दिवसांत 22 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी मिळालेले दर लक्षात घेऊन रिंगरोडसाठी देखील जास्तीत जास्त दर मिळावे यासाठी प्रशासनाचा आहे  यामुळेच सध्या रिंगरोडच्या मोजणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लवकरच प्रत्यक्ष खरेदीखत सुरू करू असे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.''   

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाFarmerशेतकरीGovernmentसरकार