शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही शपथविधी पवारांना अंधारात ठेवून; सुप्रिया सुळेंनी डाव भुजबळांवरच उलटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 10:42 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.काल मंत्री छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात गौप्यस्फोट केले. शरद पवार भाजपासोबत जाणार नव्हते, परंतु मी राजीनामा देऊन सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष बनवतो त्यानंतर तुम्हाला हव ते करा, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

आज पत्रकार परिषद घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सर्वजण सारख भाजपसोबत जायच म्हणत होते तेव्हा पवार साहेब दुखावले होते, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राज्याातून अनेकांनी पवार यांना विनंती केली. तर दुसरीकडे व्यासपीठावर छगन भुजबळ म्हणाले होते, की कमिटी काही नको, आम्हाला शरद पवारच अध्यक्ष हवेत. एका बाजूला हे म्हणतात पवार साहेब तानाशाही करतात दुसरीकडे अध्यक्ष हेच हवेत म्हणतात हा विरोधाभास दिसतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"काल भुजबळ एका मुलाखतीत चारवेळा म्हणाले, पवार साहेब आम्हाला म्हणाले होते मी तुमच्यासोबत भाजपसोबत येणार नाही, तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. सातत्याने पवार साहेब असं म्हटले आहेत. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलैचा शपथविधी शरद पवारांना माहिती नव्हता, त्यांना अंधारात ठेऊन हा निर्णय घेतला. हे कालच्या मुलाखतीत स्पष्ट झालं, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार