शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

घर घेण्याचं स्वप्न आणखी महाग, रेडीरेकनर दरांत सरासरी ५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 07:34 IST

राज्यभरात रेडीरेकनर दरांत सरासरी ५ टक्के वाढ

पुणे : राज्य शासनाकडून दरवर्षी १ एप्रिलपासून नवीन रेडीरेकनर दर (वार्षिक मूल्यदर तक्ते) जाहीर केले जातात. त्यानुसार सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत राज्यात रेडीरेकनर दरात सरासरी ५ टक्के वाढ करण्यात आली. यात राज्यातील महापालिका क्षेत्रात ८.८० टक्के वाढ, ग्रामीण भागात ६.९६ टक्के, तर नगरपालिका क्षेत्रात ३.६२ टक्के वाढ करण्यात आली. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी राज्यातील रेडीरेकनरची माहिती दिली.

कोरोनामुळे गतवर्षी रेडीरेकनरमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. परंतु कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्य निर्बंधमुक्त झाले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत झालेले व्यवहार, पाच वर्षांत झालेला विकास, रस्ते विकास, मेट्रो सिटी, जमीन खरेदी-विक्रीच्या ऑनलाइन जाहिरात या सर्वांचा विचार करून वस्तुनिष्ठ रेडीरेकनर जाहीर करण्याचा प्रयत्न केल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

सरकारने दोन दिवसांत काढले ३२० जीआरमुंबई : राज्य सरकारने गतिमानतेचा परिचय देत आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत तब्बल ३२० जीआर काढले. ३० तारखेला १७७ जीआर काढले, तर गुरुवारी १४३ जीआर काढण्यात आले. मंत्रालयातील विविध विभागांचे काम मध्यरात्रीनंतरही सुरू होते.

विजेचे दर कमी होणारगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महावितरणचे वीजदर दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत. मुंबईकर वापरीत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी स्वस्त होत असून अदानीच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्ट वीजदर स्थिर राहणार आहेत.

रेडीरेकनर दरn सर्वाधिक वाढ : पुणे जिल्हा (८.१५ टक्के)n सर्वात कमी वाढ हिंगोली जिल्हा (०.३८ टक्के)n महापालिका क्षेत्रात सर्वाधिक वाढ मालेगाव (१३.१२ टक्के)मुंबई महानगरातील दर८६४ झोनमध्ये २० ते २२%नी घटपुणे शहरातील दर८ झोनमध्ये १० टक्क्यांनी घटशहरी भागांत कचरा डेपो, स्मशानभूमी, दफनभूमी, कत्तलखाना, एसटीपी प्लान्टलगत १०० मीटर परिसरातील मिळकतीच्या रेडी रेकनर दरांत राज्यात २५ टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनPuneपुणेministerमंत्री