शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sinhagad Fort: दरड कोसळली! पुणेकरांच्या आकर्षणाचं ठिकाण सिंहगड पर्यटन बंद; प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 18:27 IST

सोमवारी झालेल्या पावसाने सिंहगडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर वर ही दरड कोसळली होती

Sinhagad Fort : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाने काही काळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. किल्ले सिंहगडावर रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान आता दरड हटवण्याचे काम सुरु असून तुर्तास प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरड कोसळल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने आणि रात्री येथील वाहतूक बंद ठेवण्यात येत असल्याने  येत असल्याने मोठी दुर्घटना टळली.

पुणेकरांचं आणि पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षणाचं ठिकाण असलेल्या सिंहगडचं पर्यटन पुढील काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे .सोमवारी मध्यरात्री गड परिसरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे गडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर वर ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. सकाळी गडावर जाणाऱ्या नागरिकांना या मार्गावर दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती वनविभाग आणि प्रशासनाला दिली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून वनव्यवस्थापन समितीतर्फे दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसिबीच्या साह्याने दरड हटवली जात असून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.

पुण्यात नागरिक पर्यटनासाठी सिंहगडाला जास्त पसंती देतात. दर शनिवार - रविवार सिंहगडावर असंख्य पर्यटक दाखल होतात. पण मध्यंतरीच्या काळात पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाने सिंहगडाच्या वाटेवर दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. परंतु पर्यटन सुरूच ठेवले होते. मात्र आता पुन्हा दरड कोसळल्याने प्रशासनाने सिंहगड पर्यटन पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवले आहे.   

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाTrekkingट्रेकिंगtourismपर्यटनcarकारforest departmentवनविभाग