शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी घोटाळ्यातील आरोपींचे एक कोटींचे दागिने न्यायालयाने केले परत

By विवेक भुसे | Updated: February 13, 2024 12:28 IST

दागिने काही अटीवर परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींकडून जप्त केलेले सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने परत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. टीईटी प्रकरणात जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख अश्वीनकुमार याच्या बंगळुरु येथील घरातून सुमारे २४ किलो चांदी, दोन किलो सोने आणि हिरे जप्त करण्यात आले होते. त्याचे दागिने काही अटीवर परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा घोटाळ्यात अश्वीनकुमार याला २० डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. यावेळी त्याच्या बंगळुरु येथील घरातून मोठ्या प्रमाणावर ऐवज जप्त केला होता. तसेच तत्त्कालीन शिक्षण आयुक्त तुकाराम सुपे याच्याकडेही तब्बल पावणे चार कोटींची रोख रक्कम व ऐवज जप्त करण्यात आला आहे. अश्विनकुमार याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असून खटला दोषारोप पत्र निश्चितीसाठी प्रलंबित आहे. अश्विनकुमार याच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. अक्षय शिंदे, अ‍ॅड. हर्षवर्धन पवार यांनी सायबर पोलिसांनी जप्त केलेले जवळपास एक कोटी रुपयांचे सोने चांदी व हिºयांचे दागिने आरोपीला परत मिळावेत, असा अर्ज केला होता.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही़ पी़ खंदारे यांनी अश्विनकुमार यांनी २० लाख रुपयांचे बंधपत्रावर व खटल्याचा निकाल लागेपर्यंत सर्व दागिने न विकण्याच्या अटीवर अर्ज मंजूर केला व दागिने परत करण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :GoldसोनंCourtन्यायालयPoliceपोलिस