शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांनी 'त्या ' माननीयांची सुरक्षा काढली; २३ ठिकाणांवरील गार्डही काढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 23:31 IST

पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता अमितेश कुमार यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयाची चर्चा होत आहे.

- किरण शिंदेपोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता अमितेश कुमार यांनी घेतलेल्या आणखी एका निर्णयाची चर्चा होत आहे. शहरातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, आणि अध्यक्ष राहिलेल्या काही माननीयांना पुरवण्यात येणारी पोलीस सुरक्षा (गार्ड) काढून घेण्यात आली आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढले आहेत. त्यांच्या या निर्णयाने पुन्हा एकदा शहरभर चर्चेची वय राळ उठवली आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांनी राजकीय माननियांचे सुरक्षा काढून घेतल्यानंतर अनेकांनी फोना-फोनी सुरू केल्याचे चित्र पाहिला मिळाले. 

राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पुणे शहरात अनेक व्हीआयपी वास्तव्यास आहेत. व्हीआयपी असणाऱ्या काही व्यक्तींना पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. यासोबतच जीवितास धोका असणाऱ्या अन्य काही व्यक्तींनाही पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. राजकीय दबावातून देखील काही विशिष्ट व्यक्तींना पोलिसांना सुरक्षा पुरवावी लागते. तर काही व्यक्ती स्वतःच पोलिसांकडे सुरक्षेची मागणी करत असतात.  पोलीस त्यावर निर्णय घेऊन  सुरक्षा देतात.  एखाद्या व्यक्तीला सुरक्षा देण्यासाठी नियम आहेत. राज्य सरकार एखाद्याला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश देतात. त्यानूसार संबंधित शहर पोलीस त्यांना सुरक्षा पुरवितात.

दरम्यान, सुरक्षा पुरविण्यासंदर्भात पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते. ही कमिटी संबंधित व्यक्तीची पडताळणी केल्यानंतरच सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेत असते. संरक्षण दिल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर कमिटीची बैठक होते. त्यात दिलेले संरक्षण गरजेचे आहे का, यावर निर्णय घेऊन ते काढून घेण्याचे आदेश कमिटी घेते. दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरक्षा कमिटीची बैठक घेत आढावा घेतला. यानंतर गरज नसणाऱ्या बहुतांश व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून पुणे शहर पोलिसांकडून ११० जणांना पोलीस सुरक्षा पुरवली होती. त्यातील ८५ जणांची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. शहर पोलिसांनी एकूण ११० जणांना पोलीस सुरक्षा पुरवली होती. त्यातील ८५ जणांची पोलीस सुरक्षा काढली आहे. शहरात आता केवळ २५ व्यक्तींनाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यामध्ये अति महत्त्वाचे व्यक्ती किंवा ज्यांच्या जीवाला धोका आहे अशांचा समावेश आहे. त्यासोबत अनावश्यक अशा शहरातील २३ ठिकाणांवरील  सुरक्षा गार्ड काढण्यात आले आहेत. 

नव्याने सुरक्षा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडे चालू वर्षात ५४ अर्ज आले होते. परंतु, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अर्जांची पाहणीकरून सर्वांची पोलीस सुरक्षा नाकारली आहे. शहरातील मोक्का सारख्या गुन्ह्यात तक्रारदार तसेच साक्षीदार असणाऱ्या चौघांचीच पोलीस सुरक्षा पोलीस आयुक्तांनी सुरू ठेवली आहे. एकीकडे कमी मनुष्यबळामुळे कामाचा ताण पडत आहे. आता यानिर्णयामुळे तब्बल साडे तीनशे पोलीस कर्मचारी हजर झाले असून, परिणामी त्याचा फायदा कामासाठी होणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे