शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढली अन् हवा बिघडली; पुणेकरांना सर्दी, घसा आणि खोकल्याचा ताप, ८ ते ११ अंशांपर्यंत तापमान घसरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:49 IST

धुळीपासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, थंड पदार्थ टाळणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे उपयुक्त ठरते

पुणे: शहरात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात अचानक आणि तीव्र बदल जाणवत आहेत. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री बोचरी थंडी असा दुहेरी अनुभव पुणेकर घेत आहेत. सध्या शहरात कमाल तापमान साधारण २८ ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान असून, किमान तापमान ८ ते ११ अंशांपर्यंत घसरले आहे. काही दिवस रात्रीचे तापमान एकल अंकी किंवा त्याच्या आसपास राहिल्याने थंडीचा प्रभाव अधिक जाणवू लागला आहे.

या बदलते हवामान आणि वातावरणातील धूळ, धुके व वाढते प्रदूषण यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप तसेच श्वसनाच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना सर्दी, घसा खवखवणे, कोरडा खोकला, दम लागणे आणि अंगदुखीची समस्या जाणवत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेचे दवाखाने, रुग्णालये, ससून सर्वोपचार रुग्णालय, तसेच खासगी दवाखान्यांच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. वाढती थंडी, बिघडलेले हवामान आणि प्रदूषण यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून योग्य काळजी, संतुलित आहार, स्वच्छता आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेतल्यास या आजारांपासून बचाव करणे शक्य असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.

लहान बालकांवर अधिक परिणाम 

हवामानातील अचानक बदलांचा सर्वाधिक फटका लहान बालकांना बसत आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्याने बालकांना सर्दी, खोकला, ताप व श्वसनास त्रास होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पालकांनी बालकांना गरम कपडे घालणे, थंड हवा व धुळीचा संपर्क टाळणे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

लहान मुलांना गरम पाणी, घरचे ताजे व पौष्टिक अन्न द्यावे. सर्दी-खोकल्याची लक्षणे वाढत असल्यास स्वतःहून औषधे न देता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप दीर्घकाळ राहिल्यास किंवा श्वसनास त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नये. - डॉ. स्मिता सांगडे, बालरोगतज्ज्ञ, कमला नेहरू रुग्णालय.

प्रौढ व ज्येष्ठ नागरिकांमध्येही तक्रारी 

हवामानातील चढ-उतार आणि प्रदूषणामुळे प्रौढ व वयोवृद्ध नागरिकांमध्येही सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि श्वसनाचे आजार वाढले आहेत. दमा, ॲलर्जी, मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

धुळीपासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, थंड पदार्थ टाळणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे उपयुक्त ठरते. घसा दुखणे किंवा आवाज बसणे यांसारख्या तक्रारी वाढल्यास वेळेवर उपचार घेणे महत्त्वाचे आहे. - डॉ. राहुल ठाकूर, ईएनटी तज्ज्ञ, ससून.----------------

तापमान व हवा गुणवत्ता चिंताजनक 

मागील आठ दिवसांत पुण्यात किमान तापमान ७.९ ते १०.९ अंशांदरम्यान राहिले असून काही दिवस एकअंकी तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम ते ‘अत्यंत खराब’ स्तरापर्यंत पोहोचला. काही ठिकाणी निर्देशांक ३०० च्या पुढे गेल्याने प्रदूषणाचा धोका अधिक वाढल्याचे दिसून आले.

शहरातील मागील ८ दिवसांचे कमाल व किमान तापमान

दिनांक कमाल तापमान (अंश सेल्सिअस) किमान तापमान (अंश सेल्सिअस)

१० डिसेंबर - २९.२ - ८.४

११ डिसेंबर - २८.७ - ७.९१२ डिसेंबर - २९.० - ८.३

१३ डिसेंबर - ३०.४ - ८.८१४डिसेंबर - २९.२ - ९.४

१५ डिसेंबर - २८.२ - ९.०१६ डिसेंबर - २८.६ - ९.४

१७डिसेंबर - २९.८ - १०.९

शहरातील मागील ८ दिवसांतील हवा गुणवत्तेची आकडेवारी (निर्देशांक)

दिनांक / कालावधी - निर्देशांक स्तर - खराब

१० डिसेंबर (संध्याकाळ) -११६ - निर्देशांक किमान (चांगला)११–१३ डिसेंबर -१३० - मध्यम ते ‘संवेदनशील गटांसाठी अनारोग्यकारक’

१४ डिसेंबर -१३२ - (दुपारनंतर २.५ उच्च) खालावलेली१५ डिसेंबर - २१५ - खराब निर्देशांक ‘खालावलेला’, काही ठिकाणी ‘खूप खालावलेला’

१६ डिसेंबर (सकाळी) - २००.८ - उच्च प्रदूषण१७ डिसेंबर (मध्यरात्र) -११५.९ - निर्देशांकात थोडा सुधार

१८ डिसेंबर / सकाळी - ३२४ - अत्यंत खराब / घातक

English
हिंदी सारांश
Web Title : Pune battles cold, poor air; illnesses surge with temperature drop.

Web Summary : Pune faces health woes as sudden weather changes bring cold, pollution. Cases of cold, cough, and respiratory issues rise, especially in children and the elderly, prompting increased hospital visits amid plummeting temperatures and poor air quality.
टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलTemperatureतापमानWinterहिवाळा