शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:28 IST

आता ३० जूनला यादी प्रसिद्ध होणार; मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहा दिवस आधी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. त्यामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण हाेणार, म्हणून पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत हाेते. पण, अकरावी प्रवेश प्रक्रियेत वारंवार हाेणाऱ्या विलंबामुळे आनंदावर विरजण पडले आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा तांत्रिक अडचणीत अडकली असून, पहिली निवड यादी जाहीर होण्यास पुन्हा चार दिवस विलंब होत आहे. ही यादी सोमवारी (दि. ३०) जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. याबद्दल विद्यार्थी - पालक यांच्यासह अभ्यासक्रम वेळेत कसा पूर्ण करायचा या चिंतेमुळे कॉलेजांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.

नव्या वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? विद्यार्थांना पडला प्रश्न

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी वापरल्या जात असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये महाविद्यालयाचा कट ऑफ दिसत नसल्याने प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यास उशीर होत आहे. 

परिणामी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही नव्याने प्रसिद्ध करावे लागले आहे. पण, मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा गोंधळ कधी संपणार? असा प्रश्न पडला आहे. 

प्रवेशासाठीही ‘तारीख पे तारीख?’

अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे संबंधित एजन्सीला ऑनलाइन प्रक्रिया राबविणे शक्य होत नाही का? अशी शंका निर्माण होत आहे. 

त्यात आता शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ३० जूनला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, ३० जून ही तारीख तरी पाळली जाणार का? हे पाहावे लागणार आहे.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण