शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

'तो' एक प्रयोग..! डॉ. नारळीकरांनी दिले होते फलज्योतिषांना 'चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:33 IST

भारतात ही चाचणी विचारपूर्वक घ्यायला हवी, ती कशी घेता येईल? या विवंचनेत मी असताना नरेंद्र दाभोलकर माझ्या मदतीला आले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याबरोबर एका प्रयोगात भाग घ्यायचा योग डॉ. जयंत नारळीकर यांना २००८ मध्ये आला होता, त्या अनुभवावर आधारित काही नोंदी त्यांनी साधना साप्ताहिकाच्या ३० ऑगस्ट २०१४ च्या अंकात मांडल्या आहेत. त्यातील सारांश...भारत हा अंधश्रद्धांचा देश आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. ज्याप्रमाणे विचारस्वातंत्र्यामुळे इथे विविध धर्म, संप्रदाय, तत्त्वज्ञान आदींना आसरा मिळाला; त्याचप्रमाणे अंध विश्वासांनादेखील खतपाणी मिळाले. फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा उगम मुळात भारतात झाला नसला, तरी त्यात लक्षणीय वाढ इथेच झाली. आज फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या भारतात जेवढी आहे, तितकी जगातल्या बाकीच्या सर्व देशांत मिळूनही नसावी. या अंधश्रद्धांना आवर घालणारा प्रमुख उपाय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे होय. हा दृष्टिकोन विज्ञानातून उद्भवला असला तरी त्याचा वापर इतर क्षेत्रांत, दैनंदिन जीवनात होऊ शकतो. एखादे विधान ठामपणे एखाद्या अधिकारी व्यक्तीने केले, तर ते विश्वासार्ह असेलच असे नाही. त्याची स्वतंत्रपणे तपासणी, शहानिशा करूनच ठरवावे, असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो.

उदाहरणार्थ लग्न यशस्वी की अयशस्वी होईल, हे पत्रिका जुळतात का नाही यावरून ठरते, असे फलज्योतिष सांगते. हे विधान प्रयोगांनी तपासता येईल. लग्न जुळून यशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या आणि लग्ने अयशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या मिसळून (पत्ते पिसावेत तसे) फलज्योतिषतज्ज्ञांना तपासायला द्याव्यात. त्यांनी पत्रिका जुळणे, न जुळणे याबद्दलचे आपले निकष लावून कुठली लग्ने यशस्वी ठरली आणि कुठली नापास झाली, ते सांगावे. त्यांचे निदान वस्तुस्थितीप्रमाणे आहे की नाही, ते संख्याशास्त्राचे नियम ठरवतील. अमेरिकेत असा प्रयोग केला गेला आणि त्यात फलज्योतिष नापास ठरले होते. भारतात ही चाचणी विचारपूर्वक घ्यायला हवी, ती कशी घेता येईल? या विवंचनेत मी असताना नरेंद्र दाभोलकर माझ्या मदतीला आले. पत्रिका जुळणे, न जुळणे याला सोपा पर्याय त्यांनी सुचवला.

लग्न झालेल्या/मोडलेल्या जोडप्यांऐवजी हुशार/मतिमंद अशा मुलांची चाचणी घ्यावी. 'हुशार' हे विशेष शाळेत त्या मुलाच्या कीर्तीवरून ठरवणे सोपे आहे. त्याचप्रमाणे मतिमंद मुलाच्या शाळेत त्यांची माहिती मिळू शकते. एकूण, इथे शंका घ्यायला जागा नाही. फलज्योतिषांचा दावा असतो की जन्मपत्रिकेमधून सांगता येते की, ज्याची ती पत्रिका आहे तो विद्यार्थी हुशार आहे की मतिमंद. तपासणीच्या प्रयोगासाठी दाभोलकरांनी अंनिसच्या मदतीने ही माहिती गोळा करायची तयारी दाखवली. यात विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक सुधाकर कुंटे यांनी प्रयोगाची एकंदर आखणी आणि कृतीबाबत मार्गदर्शन करायची जबाबदारी स्वीकारली. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती (जन्मवेळ, जन्मस्थान आदी) घेऊन त्याची पत्रिका बनवायचे काम प्रकाश घाटपांडे यांनी अंगावर घेतले. घाटपांडे हे पूर्वी स्वतः फलज्योतिषाचा व्यवसाय करत; पण नंतर त्यातील सत्याचा अभाव पाहून त्यांनी तो सोडून दिला होता. अंनिसच्या मदतीने आम्ही शंभर हुशार मुले व शंभर मतिमंद मुले यांची आवश्यक ती माहिती मिळवली आणि घाटपांडे यांनी ती माहिती वापरून त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या. सर्व पत्रिकांचे सांकेतिक रेकॉर्ड सुधाकर कुंटे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय कुठली कुंडली कोणाची, हे सांगणे शक्य नव्हते. 

प्रयोगाची सुरुवात म्हणून आम्ही चौघांनी दि. १२ मे २००८ रोजी पत्रकार परिषद घेत व्यावसायिक फलज्योतिषांनी या प्रयोगात भाग घ्यावा, असे आवाहन केले. फलज्योतिषांनी सदर कुंडल्यांचा अभ्यास करून प्रत्येक कुंडलीवर ती हुशार मुलाची आहे की मतिमंद मुलाची? ते त्यावर लिहून पाठवावे. या प्रयोगात भाग घेण्यासाठी ५१ फलज्योतिष तज्ज्ञांनी रजिस्टर्ड पाकिटे पाठवली. पण त्यांपैकी २७ स्पर्धकांनी उत्तरे पाठविली. त्यात सर्वोच्च रेकॉर्ड ४० पैकी २४ बरोबर त्यापाठोपाठ दोघांचे ४० पैकी २२ बरोबर. म्हणजे ४० पैकी २८ ही 'पास' व्हायची लाइन कोणीही ओलांडू शकला नाही.

सर्व २७स्पर्धकांच्या मार्काची सरासरी ४० पैकी १७.२५ होती. यावर काही फलज्योतिषी म्हणू लागले की, ज्या स्पर्धकांनी भाग घेतला ते निष्णात फलज्योतिषी नव्हते; म्हणून निकाल फलज्योतिषाविरुद्ध लागला. पण आमच्याकडे जे ५१ स्पर्धक प्रथम आले, त्या सर्वांनी स्वतःचा अनेक वर्षाचा त्या विषयाचा अनुभव मांडला होता. शिवाय एका संस्थेने भाग घेतला, त्याचे काय? त्या संस्थेतील सगळे सदस्य फलज्योतिषी नव्हते का? या धर्तीवर आणखी प्रयोग करता येण्याजोगे आहेत. खुद्द नरेंद्र दाभोलकरांचा त्याला पाठिंबा होता. त्यांच्या पश्चात इतर सत्यशोधक त्यासाठी पुढे येतील, अशी आशा आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर