शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh: त्या तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 17:43 IST

तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता

पुणे : शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. कुचीकने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने केली होती. त्यानंतर तरुणी गायब झाली आहे. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचीकवर आरोप केला आहे. 

''पुण्यात ज्या तरुणीने शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. ती तरुणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची झाली आहे. शनिवारी या पिडीतेने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुणे पोलिसांच्या प्रसंगावधानाने त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. पण आता मात्र ती मुलगी कुठेच सापडत नाही. त्या तरुणीला रघुनाथ कुचीकनेच गायब केलं आहे. असं त्या म्हणाल्या आहेत.  

 मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरूप असावी 

 भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आणि पुणे पोलीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. बेपत्ता झालेल्या तरूणीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. तीचं आजचं लोकेशन पणजी दाखवत आहे ,पोलीस तसा तपास देखील करत आहे असे सांगत चित्रा वाघ यांनी ती मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरूप असावी अशी प्रार्थना देखील केली आहे. त्याचारोबत त्यांनी रघुनाथ कुचीक यानेच त्या मुलीला बेपत्ता केलं नसेल ना? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

रुपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र

त्याचबरोबर जी मुलगी बेपत्ता झाली आहे ती आमच्या संपर्कात आहे अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज सकाळीच दिली होती. त्यांच्या या विधानावर  देखील चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे.ती मुलगी बेपत्ता असताना देखील जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने असं बेजबाबदार विधान करून आपलं अडाणी पण दाखवू नये अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliceपोलिसWomenमहिला